Wheat Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून गहू (Wheat Crop) या अन्नधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड (Farming) केली जात आहे. भारतातील पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यात गव्हाची सर्वाधिक शेती केली जाते.

मात्र असं असलं तरी आपल्या महाराष्ट्रात देखील गव्हाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो गव्हाची लागवड संपूर्ण भारत वर्षात रब्बी हंगामात (Rabbi Season) मोठ्या प्रमाणात केली जाते. मित्रांनो आगामी काही दिवसात रब्बी हंगाम सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत गव्हाची लागवड करण्यासाठी राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील आता पुढे सरसावणार आहेत.

या अनुषंगाने आज आपण आपल्या राज्यातील गहू उत्पादक शेतकरी (Wheat Grower Farmer) बांधवांसाठी गव्हाच्या एका सुधारित जातीची (Wheat Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो खरं पाहता संपूर्ण भारत वर्षात वेगवेगळ्या जातींच्या गव्हाची लागवड केली जाते.

मात्र आज आपण ज्या गव्हाच्या जातीविषयी चर्चा करणार आहोत, ती गव्हाची जात जास्त तापमानात देखील चांगले उत्पादन देत असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गव्हाच्या या सुधारित जाती विषयी सविस्तर.

गव्हाची लागवड नेमकी केव्हा करावी बर

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे, गव्हाची लागवड जिरायत आणि बागायती अशा दोन्ही परिस्थितीमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत कृषी क्षेत्रातील जाणकार लोक शेतकरी बांधवांना जिरायत भागात गव्हाची लागवड करायची असल्यास ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्याचा सल्ला देतात.

तसेच ज्या शेतकरी बांधवांना बागायती भागात गव्हाची पेरणी करायची आहे, अशा शेतकरी बांधवांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गव्हाची पेरणी करावी. जेणेकरून गहू या रब्बी हंगामातील मुख्य पिकातून शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन घेता येणे सहज शक्य होणार आहे.

गव्हाची नवीन जात झाली विकसित

मित्रांनो गतवर्षी तापमान वाढीमुळे भारतात गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. जाणकार लोकांच्या मते, तापमान वाढीचा गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. अशा परिस्थितीत आता शास्त्रज्ञांनी गव्हाची एक नवीन जात विकसित केली आहे. शास्त्रज्ञांनी गव्हाची पीबीडब्ल्यू 826 हे गव्हाचे नवीन वाण शोधून काढले आहे.

शास्त्रज्ञांनी शोधलेले हे नवीन वाण जास्त तापमानात देखील चांगले उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. मित्रांनो गव्हाच्या या नवीन जातीचा शोध पंजाब कृषी विद्यापीठाने लावला आहे. एचडी 3086 आणि एचडी 2967 या गव्हाच्या दोन्ही जातीपेक्षा या जातीचा गहू जवळपास 17 टक्के अधिक उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. अशा परिस्थितीत पीबीडब्ल्यू 826 हे गव्हाचे नवीन वाण गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.