Wheat Farming : मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होईल. रब्बी हंगामात संपूर्ण भारत वर्षात शेतकरी बांधव (Farmer) गहू या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.

अशा परिस्थितीत गव्हाची लागवड (Wheat Cultivation) आगामी काही दिवसात सुरू होणार आहे. मित्रांनो गव्हाची लागवड ही साधारणपणे नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत केली जाते. मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाच्या शेतीतून निश्चितच शेतकरी बांधवांना चांगली कमाई (Farmer Income) होऊ शकते.

मात्र यासाठी शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित आणि प्रगत वाणांची पेरणी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गव्हाच्या काही सुधारित जातींची (Wheat Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया भारतात उत्पादित केल्या जाणाऱ्या गव्हाच्या काही प्रमुख जाती.

गव्हाच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे :-

लोक-1 (लोकवन) :- मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार गव्हाची ही एक सुधारित जात आहे. गव्हाची ही सुधारित जात शेतकरी बांधवांसाठी विशेष फायदेशीर ठरत आहे. या जातीचे आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. ही जात लवकर उत्पादन देण्यास तयार होत असल्याचा दावा केला जातो.

जाणकार लोकांच्या मते पेरणी केल्यापासून अवघ्या शंभर दिवसात या जातीच्या गव्हापासून उत्पादन मिळण्यास सुरवात होते. खरं पाहिल्यास, उशिरा पेरणी म्हणजे पसात पेरणीसाठी देखील ही एक सर्वोत्तम जात मानली जाते. मात्र या जातीला ब्लॅक स्पॉट रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो. मित्रांनो या शंभर दिवसात तयार होणाऱ्या या जातीपासून शेतकरी बांधवांना 40-45 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते.

HD-3086 (पुसा गौतमी) :- गव्हाची ही देखील एक सुधारित जात आहे. ही जात भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे तयार करण्यात आली आहे. याच्या गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप जास्त असते. जाणकार लोकांच्या मते या जातीच्या गव्हात 12.5% ​​पर्यंत प्रथिने आढळतात. यातून शेतकरी 130 दिवसांत उत्पादन घेऊ शकतात. निश्चितच लोकवन जातीपेक्षा या जातीला उत्पादन देण्यास उशीर होत असतो. मात्र या जातीच्या गव्हामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने या गव्हाला बाजारात मोठी मागणी असते.

HI-1620 (पुसा गहू 1620) :- ही जात अलीकडेच विकसित करण्यात आली आहे. ही देखील गव्हाची एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. भारतीय संशोधन प्रादेशिक केंद्र, इंदूर येथे गव्हाची ही जात 2019 मध्ये विकसित करण्यात आली आहे. त्याच्या 1000 दाण्यांचे वजन 40-45 ग्रॅम पर्यंत असते. ही जात 125 ते 140 दिवसांत काढणीसाठी तयार होते तसेच या जातीच्या गव्हापासून उत्कृष्ट चपात्या बनवल्या जातात. अशा परिस्थितीत या जातीला बाजारात मोठी मागणी असते.