Wheat Farming : भारतात सध्या खरीप हंगाम प्रगतीपथावर आहे. खरीप हंगाम (Kharif Season) आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात देखील खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. येत्या काही दिवसात खरीप हंगामातील पिकांची काढणी देखील पूर्ण होणार आहे.

अशा परिस्थितीत देशात आता रब्बी हंगामाला (Rabi Season) लवकर सुरुवात होईल. मित्रांनो रब्बी हंगामात सर्वाधिक गव्हाची शेती पाहायला मिळते. आपल्या राज्यात देखील गहू लागवड (Wheat Cultivation) मोठ्या प्रमाणात केली जाते.

येत्या काही गव्हाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना (Farmer) एक मोलाचा सल्ला देखील जारी केला आहे. वैज्ञानिकांच्या मते शेतकरी बांधवांनी 20 ऑक्टोबर पासून आगात पेरल्या जाणार्‍या गव्हाच्या पेरणीला सुरुवात केली पाहिजे.

दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना सुधारित वाणांची (Wheat Variety) पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. मित्रांनो याशिवाय शेतकरी बांधवांनी गव्हाची पेरणी योग्य वेळेत करावी जेणेकरून त्यांना गव्हाच्या शेतीतून अधिक उत्पन्न मिळू शकते. 

गव्हाच्या पेरणीची योग्य वेळ जाणून घ्या बर…! 

तज्ज्ञांनी सल्ल्यामध्ये असे सांगितले आहे की, लवकर पेरल्या जाणाऱ्या वाणांसाठी शेतकरी 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान कधीही गव्हाची पेरणी करू शकतात. दुसरीकडे, जर आपण गव्हाच्या इतर जातींबद्दल बोललो तर 10 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा काळ पेरणीसाठी सर्वात योग्य आहे. 

चाचणीनंतर बियाण निवडा

  • तज्ज्ञांच्या मते, शेतकऱ्यांनी विविध बियाणे एकत्र न मिसळता एकाच जातीचे बियाणे एकाच शेतात पेरले पाहिजे.
  • चांगल्या उत्पादनासाठी प्रमाणित बियाणेच वापरावे आणि पेरणीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करावी म्हणजे बियाण्यातील रोगाची शक्यता कमी होते.
  • थिरम आणि कॅप्टनचा वापर बीजप्रक्रियेसाठी करता येतो. लक्षात ठेवा की त्यावर लेप केल्यावर बिया सावलीच्या जागी वाळवाव्यात.
  • खोल नांगरणी न करण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पेरणीच्या वेळी खोल नांगरणी केली तर बियाणे उगवत नाहीत.