Wheat Cultivation : देशात खरीप हंगाम (Kharif Season) अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या देशात रब्बी पिकांच्या (Rabi Crops) पेरणीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील रब्बी पिकांच्या लागवडीचे काम सुरु झाले आहे. मित्रांनो रब्बी हंगामात गहू, जवस हरभरा यांसारख्या विविध पिकांची शेती केली जाते. बहुतेक पिकांच्या लवकर पेरणीसाठी, 15 ऑक्टोबर नंतर पेरणी करणे पिकासाठी अनुकूल असते. गहू (Wheat Crop) हे रबी हंगामातील एक मुख्य पीक आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, 15 नोव्हेंबरपर्यंत गव्हाची पेरणी (Wheat Farming) केल्यास, शेतकरी (Farmer) 45 क्विंटलपर्यंत गव्हाचे उत्पादन घेऊ शकतात. यामुळेच शेतकऱ्यांना गव्हाची लवकर लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. गव्हाची लागवड 15 नोव्हेंबरपर्यंत केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर गहू पेरणी करावी.

गव्हाचे उत्पादन कस बर वाढवणार 

मित्रांनो कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या महत्वपूर्ण माहिती नुसार, 30 नोव्हेंबरपूर्वी गव्हाची पेरणी केल्यास अतिरिक्त खत आणि सिंचनाची आवश्यकता नसते. यावेळी पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना गव्हाच्या पिकातून चांगले उत्पादन मिळणार आहे शिवाय गव्हाचे पीक 140 दिवसांत पिकते. आपल्या महाराष्ट्रात देखील गहू लागवड विशेष उल्लेखनीय असून वेळेत गव्हाची पेरणी केल्यास राज्यातील शेतकरी अगदी कमी कष्टात 25 लाख टनांपर्यंत गव्हाचे उत्पादन घेऊ शकतात. दुसरीकडे गव्हाची उशिरा लागवड केल्यास हवामान बदलाचा पिकावर परिणाम होऊ शकतो.

उशिरा पेरणी केल्यास जोरदार वाऱ्यामुळे पिकावर वाईट परिणाम होतो. उष्ण वाऱ्यामुळे गव्हाचे दाणे सुकतात. अशा परिस्थितीत गव्हाच्या उत्पादनात घट होते. शिवाय, उत्पादनाचा दर्जाही मोठ्या प्रमाणात घसरतो. गव्हाचे उत्पादन कमी येते शिवाय उशिरा पेरणी केल्यास गव्हाचा दर्जा कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.

एका अंदाजानुसार, 11 ते 18 डिसेंबर दरम्यान गव्हाची पेरणी केल्यास 10 ते 12 क्विंटल उत्पादनात घट होऊ शकते. यामुळेच चांगल्या दर्जाच्या आणि उच्च उत्पादनासाठी 30 नोव्हेंबरपूर्वी गव्हाची पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो.

तसेच शेतकरी बांधवांना गहू पेरणी करताना सुधारित जातींची निवड करण्याचा सल्ला दिला जातो. गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केल्यास शेतकरी बांधवांना निश्‍चीतच अधिक उत्पादन मिळणार आहे शिवाय उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे.