Weather Update : महाराष्ट्रात पूर्व विदर्भात तसेच घाटमाथ्यावर पावसाचे (Rain) सत्र सुरूच आहे. गेल्या महिन्यात विदर्भात पावसाने (Monsoon) अक्षरशः थैमान माजवलं होतं. पावसामुळे (Monsoon News) गेल्या महिन्यात तसेच या महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात विदर्भात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन पूर्त विस्कळीत होतं.

मात्र आता गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी देखील पावसाची संततधार अजून पूर्णपणे थांबलेली नाही. उर्वरित राज्यात मात्र पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेती कामाला वेग आला असल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेली वादळी प्रणाली आता हळूहळू पश्चिमेकडे सरकत असून त्याच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता (Maharashtra Monsoon Update 2022) निर्माण झाली आहे. या वादळी प्रणालीमुळे आज मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसेच कोकणात जोरदार स्वरूपाचा पाऊस (Maharashtra Weather Update) कोसळणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून उर्वरित राज्यात हलक्‍या पावसाचा अंदाज देखील यावेळी भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते आज 22 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकणासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे आणि सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात देखील आज हलका ते मध्यम पाऊस कोसळणार आहे.

भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या आपल्या आजच्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्याच्या विशेषता घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे. या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्‍यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट आज जारी केला आहे.

निश्चितच आज विदर्भासाठी भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातील विदर्भवासियांनी सुटकेचा श्वास घेतला असेल. दरम्यान उर्वरित राज्यात हलका स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याने आता राज्यात शेती कामाला वेग येणार आहे. बळीराजा पुन्हा एकदा शर्तीने खरीप हंगामातील वाचलेली पिके जोपासण्यासाठी लढा देणार आहे.