Weather Update: महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून पावसाचे (Rain) तांडव सुरूच आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सऱ्या बरसत आहेत.

आज शुक्रवारी देखील राज्याच्या विविध भागात पावसाची (Monsoon) शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Imd) वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची (Monsoon News) शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील पावसाची शक्यता लक्षात घेऊन हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट आज जारी करण्यात आला आहे. हवामान विभाग मुंबई केंद्र यांच्याकडून जारी झालेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, 13 ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि मराठवाड्यातील नांदेडमध्ये अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने या चार जिल्ह्यांना मुंबई हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, याआधी म्हणजे काल गुरुवारी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस सुरूच होता. सध्या राज्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिकांची नासाडी नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आज आणि उद्या राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याने हंगामातील वाचलेली पिके देखील पावसाच्या भक्षस्थानी जाणार असल्याचे चित्र आहे. याआधीच पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिवाय आता मुंबई हवामान विभागाने राज्यातील दक्षिण कोकणातील, मध्य महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला असल्याने पुन्हा एकदा शेतकरी बांधवांचे नुकसान अटळ आहे.

दरम्यान जाणकार लोकांनी शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची, आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे या वेळी आवाहन केले आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी बांधवांनी पीक व्यवस्थापनाचे कामे त्वरित करावीत असा सल्ला देखील यावेळी जाणकार लोकांकडून देण्यात येत आहे.