Village Business Idea: आजकाल प्रत्येकाला बॉस व्हायचे आहे, त्यासाठी त्याला चांगला व्यवसाय (Business) सुरू करावा लागतो. पण त्या व्यक्तीला समजत नाही की कोणता व्यवसाय (small business) सुरू करायचा. ज्यामध्ये तोटा कमीत कमी आणि नफा जास्त असेल.

त्यासाठी आम्ही एक चांगली बिजनेस आयडिया (business idea) आणली आहे. ज्यामध्ये तोटाही होणार नाही आणि नफाही ठीक-ठाक होईल. अशा लोकांसाठी हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो, जे आता नव्या व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवत आहेत. आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलता होतो व्यवसाय गायीच्या शेनाशी निगडीत आहे. हो, मित्रांनो गायीच्या शेनापासून (cow dung) तुम्ही काही उत्पादने बनवून बजारात चांगल्या चढ्या किमतीने विकू शकता.

यामुळे तुम्हाला लाखो रुपयांची कमाई (income) होणार आहे. हा व्यवसाय पशुपालकांसाठी (livestock farmer) फायदेशीर ठरू शकतो. कारण पशुपालन व्यवसायात (animal husbandry) कमाईच्या मर्यादित संधी आहेत. आतापर्यंत ते फक्त दूध, तूप आणि दही विकून आपला व्यवसाय चालवत होते. ज्यातून त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. मात्र जे शेणखत (cow dung business) केवळ पिकांच्या वाढीसाठी उपयोगात आणले जात होते आणि अगदी कवडीमोल दरात विकले जात होते त्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे.

म्हणजे जी गोष्ट निरुपयोगी समजली जात होती, ती आज व्यवसायाचे साधन बनली आहे. गायीच्या शेनापासून पशुपालक शेतकरी बांधव आता थोडे अधिक पैसे कमवू शकतात. निश्चितच पशुपालक शेतकरी बांधवांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. तुम्ही विचार करत असाल की शेण कोण विकत घेईल. खरं तर पूजेच्या ठिकाणी, हवन साठी शेणाच्या गौऱ्या तसेच शेनापासून बनवलेल्या काठ्याची आवश्यकता असते.

कारण की गाईचे शेण पूजेसाठी अत्यंत शुद्ध मानले जाते. त्यामुळे गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या लाकडाची किंमत वाढली आहे. शहरात गाईच्या शेणाच्या गौऱ्या तसेच गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेले लाकडे पूजेसाठी मोठ्या चढ्या दरात विक्री होत आहेत. याला बाजारात चांगला भाव मिळत आहे. म्हणजेचं पशुपालक शेतकरी बांधव शेणापासून लाकूड बनवून बाजारात चांगल्या किंमतीला विकू शकता.

जर तुमच्याकडे गायी नसतील तर तुम्ही डेअरी फार्ममधून शेण खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला लाकूड बनवण्यासाठी पेंढा देखील लागेल, जो तुम्हाला बाजारात अगदी कमी किमतीत मिळेल. या व्यवसायात तुम्ही अतिशय कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता, तुम्हाला फक्त थोडा संयम आणि मेहनत घेऊन काम करावे लागेल.