Vegetable Farming : भारतात सध्या शेतकरी बांधव (Farmer) खरीप पीक व्यवस्थापन (Crop Management) करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना खरीप पिकातून उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी जाणकार लोक सल्ला देखील देत आहेत.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी खरीप हंगामात (Kharif Season) आंतरपीक (Intercropping) घेण्याचा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांकडून दिला जात आहे. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते पाण्याची चांगली उपलब्धता असलेल्या भागात किंवा पाणी साचलेल्या भागात पाणी पालक किंवा नळीची भाजी (Water Spinach) या रानभाजी पिकाची शेती (water spinach farming) करू शकतात. ही पालकासारखी दिसणारी पालेभाजी आहे, ज्याची झाडे कमी चौडे पण उंच असतात.

पाणी पालक आहे तरी काय 

देशाच्या अनेक भागात पाणी पालक किंवा नळीची भाजी ही हिरवी पालेभाजी म्हणून खाल्ली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील या भाजीची मोठी मागणी आहे. या भाजीपाला पिकापासून कमी कालावधीत उत्पन्न मिळू लागते. अलीकडेच ICAR-भारतीय भाजी संशोधन संस्था, वाराणसीनेही पाणी पालकच्या काशी मनू या नवीन जातीचा शोध लावला आहे.

या जातीच्या पाणी पालक पिकाची लागवड करून शेतकरी बांधव चांगला नफा कमवू शकतात. या रानभाजी भाजीपाला पिकाची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, पाणी पालक या भाजीपाला पिकाची ही जात जल प्रदूषकांपासूनही मुक्त आहे आणि कमी पाण्यातही चांगले उत्पादन देऊ शकते.

पाणी पालक भाजीपाला पीक कुठे लावले जाते बर….!

पाणी पालक या भाजीपाला पिकाची लागवड मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. मोठ्या शहरांमध्ये, लोक त्यांच्या घराच्या छतावर किंवा कंटेनरवर काशी मनू जातीच्या पाणी पालकाची लागवड करून त्यांच्या स्वयंपाकघरातील गरजा पूर्ण करू शकतात.

पशुखाद्य म्हणून फायदेशीर आहे बर…!

काशी मनु जातीचा पाणी पालक पालेभाजी, पोषक तत्वांची खाण, पशुखाद्याच्या रूपातही अतिशय फायदेशीर मानली जाते. पावसाळ्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान चारा पीक म्हणून व्यावसायिक लागवडीचाही मोठा फायदा होईल.

खर्च आणि उत्पन्न याच गणित समजून घ्या 

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की पाणी पालक ही एक रानभाजी आहे. या भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी प्रति हेक्‍टर एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. शेतकरी बांधवांनी दीड लाख रुपये खर्च करून एका हेक्टरमध्ये पाणी पालक या भाजीपाला पिकाची लागवड केल्यास त्यांना सुमारे 90 ते 100 टन उत्पादन घेऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही पालेभाजी बाजारात 15 ते 20 रुपये किलो दराने विकली जाते. अशाप्रकारे काशी मनू जातीच्या पाणी पालक भाजीची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात.