Vegetable Farming: मित्रांनो सध्या देशात खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. मात्र असे असले तरी मोसमी पाऊस शेतकरी बांधवांच्या (Farmer) मुळावर उठला आहे. देशातील अनेक भागात मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पावसाने अक्षरश थैमान माजवला आहे.

त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असून शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या पिकातून अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmer Income) मिळणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव खरीप हंगामातील पिकांची भरपाई काढण्यासाठी खरीप हंगामानंतर काही भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती करून चांगली कमाई करू शकणार आहेत.

यामुळे आज आपण खरीप हंगामानंतर लावता येणाऱ्या काही प्रमुख भाजीपाला पिकांच्या लागवडीची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो खरे पाहता भाजीपाला वर्गीय पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे. भाजीपाला पिके कमी दिवसात आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होत असल्याने यांची शेती शेतकऱ्यांसाठी लाभदायक सिद्ध होत आहे. चला तर मग मित्रांनो खरीप हंगामानंतर कोणत्या भाजीपाला पिकांची शेती केली जाऊ शकते याविषयी जाणून घेऊया.

हिरवी मिरचीची शेती 

मित्रांनो हिरवी मिरची हे एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाला सदाहरित पीक म्हणून शेतकरी बांधव ओळखत असतात. मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक भाजीत केला जात असल्याने याची मागणी बाजारात बारामाही असते. मात्र असे असले तरी हिवाळी हंगामात याची मागणी सर्वाधिक असल्याचे जाणकार स्पष्ट करतात.

अशा परिस्थितीत खरीप हंगामानंतर शेतकऱ्यांना हवे असल्यास हिरव्या मिरचीच्या शेतीतून त्यांना चांगली कमाई होणार आहे. मित्रांनो या पिकाचे आंतरपीक म्हणून किंवा मुख्य पीक म्हणून देखील लागवड करता येते. जाणकार लोकांच्या मते, या पिकाची सप्टेंबरच्या सुरुवातीला लागवड केली जाऊ शकते. मिरचीच्या सुधारित जातींची लागवड केल्यास शेतकरी बांधवांना चांगली कमाई होणार आहे.

वांग्याची शेती 

भारतीय मंडईंमध्ये वांग्याला खूपच मागणी आहे. या पिकाला बाजारपेठेत चांगला दर देखील मिळतो. हिवाळ्यात वांग्याला सर्वाधिक बाजार भाव मिळत असल्याचे जाणकार स्पष्ट करतात. अशा परिस्थितीत खरीप हंगामानंतर या पिकाची शेती शेतकऱ्यांना मालामाल करून सोडणार आहे. सप्टेंबर महिन्यात या पिकाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे. अशा परिस्थितीत सप्टेंबर मध्ये लागवडीस सुरुवात करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीनुसार शेताची तयारी व इतर कामे करणे आवश्यक आहे. वांग्याची शेती शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळवून देत असले तरीदेखील वांग्याच्या सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला जाणकार लोकांकडून दिला जात आहे.

शिमला मिरची शेती 

सिमला मिरचीला बाजारात खरं पहाता बारामाही मागणी असते. मात्र हिवाळ्याच्या दिवसात या पिकाला सर्वाधिक बाजार भाव मिळतो. या पिकाची पॉलिहाऊसमध्ये बारामाही शेती केली जाते. मात्र रब्बी हंगामातील पेरणीचे काम सप्टेंबरमध्ये सुरू होते, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कमी वेळेत चांगले पैसे मिळवायचे आहेत ते सिमला मिरचीची रोपवाटिका आता तयार करू शकतात. सप्टेंबर मध्ये या पिकाची शेती केल्यास शेतकऱ्यांना चांगली कमाई होणार आहे.