Vegetable Farming : ऑगस्ट महिन्यात शेतकरी बांधव (Farmer) शेतात रब्बी पिकांची (Rabbi Crops) पेरणी करण्यासाठी शेतीची पूर्व मशागत (Pre cultivation) सुरू करतात. शेतकरी बांधवांनी या अनुषंगाने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करायला सुरुवात केली आहे.

सप्टेंबर महिन्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाते शिवाय या महिन्यात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) देखील शेती (farming) करू शकतात. अशा परिस्थितीत आता मी आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेती विषयी माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण सप्टेंबर महिन्यात कोण-कोणत्या भाजीपाला पिकांची शेती केली जाऊ शकते आणि शेतकरी बांधव यातून कशा पद्धतीने चांगली कमाई (Farmer Income) करू शकतात याविषयी जाणून घेणार आहोत.

सप्टेंबर महिन्यात लावता येणारे काही भाजीपाला पिके

ब्रोकोली

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे ब्रोकोली हे एक विदेशी भाजीपाला पीक आहे. ही भाजी कोबीसारखी दिसते. बाजारात या भाजीची मागणी झपाट्याने वाढत आहे.  भारतीय बाजारपेठेत या भाजीला 50 ते 100 रुपये किलो असा बाजार भाव मिळतो. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या भाजीपाला पिकाची लागवड सप्टेंबर महिन्यात सुरू होते. त्यावेळी नर्सरीत त्याची लागवड केली जाते. खरं पाहिले तर 60 ते 90 दिवसांत ब्रोकोलीचे पीक तयार करून बाजारात विकता येते.

हिरवी मिरची

प्रत्येक भाजीत हिरवी मिरची टाकली जाते. हिरवी मिरची भाजीमध्ये घातल्याने जेवणाची चव आणि तिखटपणा वाढतो. त्यामुळे या भाजीला वर्षभर मागणी राहते. अशा परिस्थितीत जर तुम्ही सप्टेंबरच्या सुरुवातीला तुमच्या शेतात हिरव्या मिरचीची लागवड केली तर त्यातून चांगला नफा मिळवता येईल.

वांगी

वांग्याची लागवडही सप्टेंबर महिन्यात केली जाते. ही भाजी वाढवणे खूप सोपे आहे. जर तुम्ही तुमच्या शेतात हंगामानुसार त्याची लागवड केली तर तुम्हाला जास्त उत्पादनासह चांगला नफा मिळू शकतो. या भाजीचे सर्वात चांगले वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही सेंद्रिय पद्धतीने वांग्याची लागवड केली तर तुम्ही या भाजीला रोगांपासून सहज वाचवू शकता.

शिमला मिरची

सिमला मिरची ही अशी भाजी आहे, ज्याची मागणी भारतीय बाजारपेठेत नेहमीच असते, कारण बहुतेक लोकांना ही भाजी खायला आवडते. या भाजीपाल्याची पेरणीची प्रक्रियाही सप्टेंबर महिन्यात सुरू होते. तुम्हालाही शेतीतून अधिक नफा मिळवायचा असेल तर सप्टेंबर महिन्यापर्यंत या पिकाची शेतात लागवड करावी.