Vegetable Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. आपल्या राज्यात देखील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणावर हिरव्या भाज्यांचे उत्पादन घेत असतात.

विशेष म्हणजे भारतात भाजीपाला पिकांची खपत देखील खूप अधिक आहे. यामुळे शेतकरी बांधवांना भाजीपाला पिकांची शेती (Farming) फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. पडवळ (Pointed Gourd Crop) देखील असंच एक भाजीपाला पीक असून फळभाजीच्या श्रेणीत गणले जाते.

पडवळबद्दल जर बोलायचे झाले तर हे एक फळभाजी पीक असून अलीकडे लोकप्रिय भाजी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. खेड्यापाड्यात तर सोडाच आता शहरांमध्ये देखील पडवळची भाजी हातोहात विकली जाऊ लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांना हवे असल्यास ते या भाजीपाला पिकाच्या लागवडीतून कमी वेळात चांगला नफा कमवू शकतात. या पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या पिकाची लागवड बारामाही शेतकरी बांधव करू शकतात. यामुळे आज आपण पडवळ या पिकाच्या लागवडी विषयी (Pointed Gourd Farming) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पडवळ लागवड भारतात कुठ-कुठं केली जात आहे

भारतातील बहुतांश भागात पडवळची लागवड केली जाते. त्याच्या मोठ्या उत्पादक राज्यांबद्दल सांगायचे तर, बिहार, पश्चिम बंगाल, पूर्व उत्तर प्रदेश व्यतिरिक्त, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, आसाम या राज्यात पडवळची लागवड केली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी वर्षातून एकदा का होईना पडवळची लागवड करत असतात.

माती आणि हवामान

जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधव सर्व प्रकारच्या हवामानात पडवळचे चांगले उत्पादन मिळवू शकतो. मात्र या पिकाची लागवड फक्त सामान्य तापमान, उष्ण तापमान किंवा पाऊस या काळातच करावी लागते. हिवाळ्यात पडवळची झाडे नीट वाढत नाहीत.

मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या आणि चिकणमाती असलेल्या जमिनीत पडवळ ची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळत असते. जास्त पाऊस किंवा पाणी साचत असलेल्या शेतजमिनीत याची लागवड करू नका. कारण शेत जमिनीत पाणी साचल्यानंतर इतर पिकांप्रमाणेच पडवळची रोपे कुजायला लागतात आणि परिणामी उत्पादनातं मोठी घट होते.

पडवळ लागवड पद्धत तर जाणून घ्या बर 

पडवळच्या लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात. अनेक शेतकरी पडवळ रोपांच्या मुळांद्वारे त्याची पुनर्लावणी करण्याचे कामही करतात.

त्याच्या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धतीने शेतजमीन तयार केली जाते, त्यानंतर झाडे किंवा मुळे बेडवर लावावीत किंवा पाण्याचा योग्य निचरा करून बेड तयार करावे आणि या पिकाची लागवड करावी.

लावणीसाठी जून ते ऑगस्ट आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा सर्वोत्तम काळ असतो.

पडवळ ची लागवड मंडप पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळते. मंडप पद्धतीमध्ये पडवळची फळे जमिनीच्या संपर्कात येत नसल्याने रोग होण्याचा धोका देखील कमी होतो.

वेलीवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी स्टेकिंग पद्धतीचा म्हणजे मंडप पद्धतीचा वापर केल्याने कीटक-रोग होण्याची शक्यता बर्‍याच प्रमाणात कमी होते.

पडवळ पिकासाठी खत व्यवस्थापन

पडवळ शेतीतुन चांगले उत्पादन मिळण्यासाठी योग्य खत व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असल्याचे जाणकार नमूद करतात. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी चांगल्या उत्पादनासाठी प्रति हेक्टर 250 ते 300 क्विंटल चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खत, 90 ते 100 किलो नायट्रोजन, 60 ते 70 किग्रॅ. स्फुरद आणि 40 ते 50 किग्रॅ. पोटॅश खतांचा वापर केला पाहिजे. यामुळे पडवळ शेतीतुन उत्पादन चांगले मिळते.

पडवळ शेतीसाठी आवश्‍यक पाणी व्यवस्थापन 

पडवळ रोपाची किंवा मुळांची पुनर्लावणी केल्यानंतर लगेचच पहिले पाणी द्यावे लागते. जेणेकरून झाडांचा योग्य विकास होईल. याशिवाय दर 8 ते 10 दिवसांनी हलके सिंचन करावे लागते.

पडवळ लागवडीसाठी हिवाळ्यात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

कीटक आणि तण व्यवस्थापन

पडवळ रोपांच्या वाढीनंतर ते बांबूच्या खांबावर किंवा नायलॉनच्या जाळ्यांवर पसरवले जातात. या तंत्राला मंडप पद्धत असे म्हणतात. पीक व्यवस्थापनाच्या या तंत्रामुळे तणांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाहीशी होते. असे असताना देखील शेतात तण झाले असेल तर ते तण काढून टाकले पाहिजे. तसेच मंडप पद्धतीने पडवळ लागवड केल्यास पडवळ पिकातील किडी-रोगाचा प्रतिबंधही सहज होतो. यासाठी कडुनिंब आणि गोमूत्रावर आधारित कीटकनाशक वापरणे फायदेशीर आणि किफायतशीर ठरते.

पडवळ पिकातून मिळणार उत्पादन

जाणकार लोकांच्या मते पडवळ शेतीतून वर्षभरात हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन घेता येते. पडवळचे उत्तम उत्पादन पूर्णपणे शेतीच्या तंत्रावर अवलंबून असते. शेतकरी बांधवांनी जर पडवळ पिकात पीक व्यवस्थापनाची कामे योग्य पद्धतीने केली तर पडवळ पिकातून हेक्टरी 150 क्विंटलपर्यंत देखील उत्पादन घेता येते.