Tree Farming : भारतात शेती (Farming) हाच मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास 60% जनसंख्या ही शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे (Farmer) उत्पन्न दुपटीने (Farmer Income) वाढवण्यासाठी शासनस्तरावर वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. एवढेच नाही तर जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांचे उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी म्हणून त्यांना सल्ला देत आहेत.

मित्रांनो आता शेतकरी बांधवांना पीकपद्धतीत बदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पीकपद्धतीत बदल केला तसेच बाजारात मागणी मध्ये असलेल्या पिकांची शेती केली तर निश्‍चितच त्यांना अधिक उत्पन्न मिळणार आहे. मित्रांनो अलीकडे झाडांची लागवड (Tree Farming) करण्याची देखील मोठी प्रथा रूजत चालली आहे.

शेतकरी बांधव आता पारंपरिक पद्धतीला फाटा देत झाडांची लागवड करू लागले आहेत. यामध्ये सागवान, महोगणी, पॉपलर यांसारख्या झाडांचा समावेश होतो. मित्रांनो आज आपण पॉपलर या झाडाच्या (Poplar Tree) लागवडी विषयी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पॉपलर झाडाच्या शेती (Poplar Tree Farming) विषयी काही महत्त्वाच्या बाबी.

पॉपलर लागवडीचे फायदे

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, देशात आणि जगात पॉपलरच्या लाकडाला मोठी मागणी आहे. या लाकडाचा वापर हलके प्लायवूड, चॉप स्टिक्स, लाकडी पेटी, माचेस, पेन्सिल याशिवाय खेळणी आणि अनेक उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.

त्याच वेळी, चिनार म्हणजे पॉपलर झाडाच्या सालापासून लगदा देखील तयार केला जातो, ज्याचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. भारतात गेल्या काही वर्षांत चिनाराची झाडे लावण्याची प्रथा वाढली आहे. याआधी अनेक शतकांपासून आशियाई देश, उत्तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकन देशांमध्ये चिनाराची झाडे लावण्याचा ट्रेंड सुरू आहे.

पॉपलर झाडात आंतरपीक घेतल्यास दुप्पट कमाई होणार

भारतात पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि पश्चिम बंगाल इत्यादी ठिकाणी पॉपलर झाडांची बागायती केली जाते. येथे पॉपलरची झाडे लावल्यानंतर मधल्या मोकळ्या जागेवर गहू, ऊस, हळद, बटाटा, धने, टोमॅटो, सिमला मिरची यासारखी भाजीपाला व धान्य पिके तसेच औषधी पिके घेऊन शेतकरी अतिरिक्त उत्पन्न घेत आहेत. साहजिकच चिनाराची झाडे वाढण्यास 5 ते 7 वर्षे लागतात. अशा परिस्थितीत बागायती पिकांच्या लागवडीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते, ज्यामुळे लागवडीचा खर्च आणि वैयक्तिक खर्च भागवणे खूप सोपे होते.

पॉपलर शेतीतून मिळणार उत्पन्न

आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की, पॉपलर झाड लावल्‍यानंतर झाडाला परिपक्व होण्‍यासाठी बराच वेळ लागतो. एका अंदाजानुसार, त्याची लांबी सुमारे 5 ते 7 वर्षांत 85 फूटांपर्यंत पोहोचू शकते, त्यानंतर गरजेनुसार त्याची कापणी केली जाते.  पोपलर लाकूड बाजारात 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जाते. त्याच्या झाडापासून बनवलेला एक लॉग 2000 रुपयांना विकला जातो.

चिनाराच्या झाडांचे योग्य व्यवस्थापन केल्यास, प्रति हेक्टर शेतजमिनीमध्ये 250 झाडे तयार होऊ शकतात, ज्यामुळे कागदासाठी हजारो टन लाकूड आणि साल यांची व्यवस्था होते. अशा प्रकारे शेतकरी चिनाराची लागवड करून 6 लाख ते 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात. याशिवाय, पॉपलर झाडांमध्ये आंतरपीक म्हणून बागायती पिकांची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त नफा मिळतो.