Sugarcane Farming : भारतात ऊस (Sugarcane Crop) या नगदी पिकाची (Cash Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यातही ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. मित्रांनो ऊस हे नगदी पीक असलं तरीदेखील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना (Sugarcane Grower Farmer) अधिक कष्ट घ्यावे लागतात.

ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) आतापर्यंत उस नोंदणी साठी वारंवार कारखान्यावर पायपीट करावी लागत असे. मात्र आता ऊस नोंदणी (Sugarcane Registration) करण्यासाठी शेतकरी बांधवांना कुठेच भटकंती करावी लागणार नाही. आता ऊसाची नोंदणी चक्क बांधावर बसून करता येणे शक्य होणार आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ऊस नोंदणी करण्यासाठी आता शासनाने एक नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे. ‘महाउस नोंदणी’ नामक ॲप्लिकेशनच्या (Farming Application) मदतीने आता उसाची नोंदणी बांधावर बसून करता येणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचा होणारा मोठा आटापिटा टाळता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र साखर आयुक्तालयात शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सहकार मंत्री अतुल सावे यांनी उच्च नोंदणी करण्यासाठी ‘महाउस नोंदणी’ हे ॲप्लिकेशन जारी केले आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना स्वतः उसाची नोंदणी करता येणार आहे यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार तसेच यासाठी केला जाणारा आटापिटा टळणार आहे.

साखर आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उपक्रमात 40 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने उस नोंदणी केली असता त्या शेतकरी बांधवांचा उस कापण्यासाठी सक्ती राहणार आहे. यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांचा उस बिना कापणीचा राहणार नाही. निश्चितच या अप्लिकेशनच्या मदतीने ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा फायदा होणार आहे.

ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कशी करणार ऊस नोंदणी

ऊस नोंदणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना ‘महाऊस नोंदणी’ नामक एप्लीकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे लागणार आहे. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर शेतकरी बांधवांनी महाऊस नोंदणी नामक एप्लीकेशन उघडावे. ॲप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर ‘उस क्षेत्राची माहिती भरा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर ‘ऊस क्षेत्र नोंद करावयाच्या शेतकऱ्याची माहिती’ अस लिहलेले दिसेल.

यानंतर शेतकरी बांधवांना आपला मोबाईल क्रमांक तसेच आधार क्रमांक आणि आपले नाव व्यवस्थित रित्या भरावे लागणार आहे. ची माहिती भरल्यानंतर ‘पुढे’ या बटणावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर शेतकरी बांधवांना लागवडीचा प्रकार, उसाची जात, लागवड तारीख याची देखील माहिती इथे नमूद करावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो येथे एक गोष्ट लक्षात ठेवा की उसाचे क्षेत्र गुंठ्यामध्ये भरावे लागेल.

हा तपशील योग्यरीत्या भरल्यानंतर ‘पुढे’ बटण दाबावे. यानंतर स्क्रीनवर तीन कारखान्यांची नावे येतील. यापैकी किमान एक व कमाल तीन कारखान्यांची नावे शेतकरी बांधवांना टाकता येणार आहेत. एवढं केल्यानंतर उस नोंदणी यशस्वी होणार आहे आणि धन्यवाद असा मेसेज शेतकऱ्यांना स्क्रीनवर दिसणार आहे. मित्रांनो उसाची नोंदणी झाल्यानंतर ज्या कारखान्याची शेतकरी बांधवांनी निवड केली आहे त्या कारखान्याकडून शेतकरी बांधवांना संपर्क साधला जाईल.