Successful Farmer : भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपण मोठ्या अभिमानाने याचा उल्लेख देखील करत असतो. मात्र असे असताना देशातील नवयुवक शेतकरीपुत्र (Farmer) आता शेतीपासून (Farming) दुरावत असल्याचे चित्र आहे.

नवयुवक शेतकरीपुत्र आता उच्च शिक्षण घेऊन नोकरी (Job) करण्यास अधिक पसंती दर्शवत आहे. असे असले तरी आपल्या देशात असेही अनेक नवयुवक आहेत जे उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता शेती व्यवसायात गुंतत आहेत. विशेष म्हणजे हे उच्चशिक्षित नवयुवक आपल्या ज्ञानाचा वापर करत शेतीतून लाखोंची कमाई (Farmer Income) देखील करत आहेत.

ओडिशा राज्यातील बरगाड़ जिल्ह्यातील एका नवयुवक उच्चशिक्षित तरुणी ने देखील उच्च शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेती व्यवसायात अधिक पसंती दर्शविली आहे. जयंती प्रधान नामक तरुणीने एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी शेती हा व्यवसाय स्वीकारला. आजच्या घडीला जयंती मशरूम शेतीच्या (Mushroom Farming) माध्यमातून वर्षाकाठी वीस लाखांची कमाई करत आहे. त्यामुळे सध्या जयंती ताईची चांगलीच चर्चा रंगली आहे.

जयंती सांगतात की, त्यांच्या वडिलांचे स्वप्न होतं की आपल्या लेकीने चांगले उच्च शिक्षण घेऊन नोकरी करावी. वडिलांच्या स्वप्नासाठी त्यांनी एमबीए केले मात्र त्यांना नोकरी मुळीच करायची नव्हती. त्यांना लहानपणापासून शेतीचे क्षेत्र विशेष आकृष्ट करत असे. अशा परिस्थितीत उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शेतीचा मार्ग निवडला. मात्र शेती कशी करावी, कोणत्या पिकाची शेती करावी हा मोठा प्रश्न जयंती च्या पुढे उभा राहिला.

मग काय याचा विचार सुरु झाला. त्यांना वाटले की, अनेक शेतकरी शेती करूनही अपेक्षित नफा मिळवू शकत नाहीत, मग शेतीमध्ये नेमका कोणता बदल केला पाहिजे याचा देखील त्यांनी विचार करायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत त्यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करून अशी शेती करण्याचा बेत आखला ज्यातून चांगला चांगला नफा राहील आणि इतरांना रोजगार देखील मिळेल. मशरूम शेतीमध्ये अधिक संधी त्यांना दिसली. मग काय शेवटी त्यांनी मशरूम शेती करण्याचा विचार केला आणि मशरूम शेती सुरू केली.

जयंती ताईंनी मशरूम शेती सुरू केली मशरूमचे उत्पादन देखील मिळायला लागले. मात्र आता मशरूम विक्री कुठे करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा झाला. मग त्यांनी मशरूम विक्री करण्यासाठी आपल्या आसपासच्या दुकानदारांना फ्री मध्ये मशरूम दिले. लोकांना त्यांच्या मशरूमची चव आवडली आणि मग हळूहळू त्यांना मशरूमच्या मोठमोठ्या ऑर्डर्स मिळू लागल्या. मशरूम शेती मध्ये त्यांना पाच वर्षे झाली होती.

आणि मग त्यांच्या लग्नाचा विचार सुरू झाला. 2008 मध्ये त्यांचे लग्न एका सरकारी नोकरदाराशीं झाले. त्यांचे पती बिरेन्द्र प्रधान यांना देखील त्यांच्या पत्नीचे कार्य आवडले. शेवटी त्यांनी देखील आपल्या सरकारी नोकरीला त्यागपत्र दिले आणि ते देखील आपल्या पत्नीसमवेत मशरूम शेती करू लागले. आजच्या घडीला हे दोन्ही नवरा-बायको मशरूम शेतीच्या माध्यमातून वीस लाखांची वार्षिक कमाई करत आहेत. विशेष म्हणजे मशरूम शेतीसाठी आता जयंतीताई इतरांना प्रशिक्षण देखील देत आहे.