Successful Farmer : शेती व्यवसायात (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून आर्थिक प्रगती सहजरीत्या साधता येणार आहे. कोकण मधील एका शेतकरी (Farmer) बाप लेकाने हे सिद्ध करून दाखवले आहे. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते भात पिकाचे दृश्य.

कोकणात गेल्या अनेक वर्षांपासून भात पिकाची (Rice Crop) प्रामुख्याने शेती केली जात आहे. या पारंपरिक पिकाच्या शेतीतून शेतकरी बांधवांना अपेक्षित असे उत्पन्न (Farmer Income) मिळत नाही. शिवाय या पिकाच्या व्यवस्थापनासाठी (Crop Management) शेतकरी बांधवांना अधिक मेहनत घ्यावी लागते.

मात्र काळाच्या ओघात बदल केला आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची शेती केली तर निश्चितच शेतकऱ्यांना यातून यशाला गवसणी घालता येणे शक्य होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील दहिवली या गावातील विजय घाग आणि त्यांचे पुत्र विशाल घाग यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत झेंडू (Marigold Crop) या फुला पिकाच्या शेतीतून (Marigold Farming) कमी खर्चात अधिक कमाई करून दाखवली आहे. यामुळे सध्या हे शेतकरी पिता-पुत्र सर्वत्र चर्चिले जात आहेत.

6 गुंठ्यात विक्रमी उत्पन्न

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की विजय घाग आणि विशाल घाग या शेतकरी पिता-पुत्रांने आपल्या सहा गुंठे शेतजमिनीत झेंडू या फुलांची लागवड केली आहे. अथर्व ऑरेंज या झेंडूच्या सुधारित जातींची त्यांनी 1000 रोपे त्यांनी लागवड केली आहेत. या जातीची रोपे त्यांनी साताराहून मागवली आहेत.

झेंडू लागवड केल्यानंतर सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा संतुलित वापर त्यांनी केला. आधुनिक पद्धतीने शेती करण्याच्या हेतूने त्यांनी मल्चिंग पेपर तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी उपयोग केला. ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला असल्याने पाण्याची बचत झाली.

शिवाय यामुळे उत्पादनात वाढ झाली. या सहा गुंठे शेत जमिनीत लावलेल्या झेंडू पिकातून त्यांना जवळपास 50 हजार रुपयांची कमाई होणार असल्याची आशा आहे. निश्चितच कमी शेत जमिनीत देखील चांगले उत्पन्न त्यांनी कमवून दाखवले आहे.

निश्चितच काळाच्या ओघात शेतीत बदल केला तर कमी शेतजमिनीत देखील चांगले उत्पन्न कमावता येते हे या शेतकरी पितापुत्राने दाखवून दिले आहे. आजच्या या महागाईच्या काळात केवळ पारंपरिक पिकांतून मिळणारे उत्पन्न उदरनिर्वाह भागवण्यासाठी पुरेसे नाही. यासाठी शेतकरी बांधवांना पीक पद्धतीत बदल करणे अतिशय आवश्यक आहे. घाग कुटुंबीयाने देखील शेतीमध्ये बदल करत हे दाखवून दिले आहे.