Successful Farmer : भारतात आता काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. देशातील शेतकरी बांधव (farmer) आता मागणी मध्ये असलेल्या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (farming) करत आहेत. यामुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न (farmer income) दुपटीने वाढत आहे.

उत्तर प्रदेश मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत लिंबू लागवडीच्या (lemon farming) माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील हरदोई जिल्ह्याच्या रामबाबू या प्रगतिशील शेतकऱ्याने लिंबू (lemon crop) लागवड करून एका एकरात पाच लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या हा प्रयोगशील शेतकरी चांगलाच चर्चेत आला आहे.

लिंबू बागकामामुळे लाखो शेतकरी बांधवांना फायदा होत आहे. लिंबू उत्पादक शेतकऱ्याने सांगितले की, लिंबूच्या शेतीतून 1 एकरमध्ये 5 लाखांची जंगी कमाई होत आहे. रामबाबू यांच्या मते, 1 एकरमध्ये सुमारे 140 रोपे लावता येतात. भारतात या लिंबूचे रोप 20 रुपयांना सहज उपलब्ध होते.

लिंबूचे पीक 3 वर्षानंतर फळ देण्यास सुरवात करते.  या या प्रयोगशील शेतकऱ्याच्या मते, लिंबू बागकामासाठी तो फक्त सेंद्रिय खत वापरतो. त्यांनी सांगितले की कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी ते कडुनिंबाच्या पानांचे द्रावण फवारतात. तसेच सेंद्रिय खतासाठी उसापासून बनवलेले खत किंवा मळी, मेंढ्या आणि शेळ्यांच्या लेंडी खताचा वापर केला जातो.

ते म्हणाले की, लिंबाचे झाड वर्षभर उत्पन्न देते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत लिंबाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. बाजारात 40 ते 200 रुपयांपर्यंत लिंबाला दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. लिंबू बागकाम हे वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळे फायदे देणारे पीक आहे. हरदोईचे जिल्हा फलोत्पादन अधिकारी सुरेश कुमार यांनी सांगितले की, लिंबूच्या शेतीतून शेतकऱ्यांना फायदा मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आता मोठ्या संख्येने आता लिंबू बागायतीसाठी जिल्हा फलोत्पादन विभागाशी संपर्क साधत आहेत.

त्यांनी सांगितले की, लिंबू बागकाम करण्यासाठी उन्हाळ्यात शेतात खड्डा खणायला हवा. शेतात रोपे लावताना खड्ड्यात शेणखत टाकून 2 किलो स्यूडोमोनास व 2 किलो ट्रायकोडर्मा वापरावे. त्यानंतर 1 एकरात 20 फूट अंतरावर सुमारे 140 झाडे लावावीत. त्यांनी सांगितले की, रोग टाळण्यासाठी झाडाला निळी वाळू आणि चुना मिसळून 1 फूट उंचीपर्यंत रंगवावे. हे बुरशी आणि इतर रोग आणि साथीदार कीटकांपासून संरक्षण करते. लिंबू हे वर्षभर बाजारात चांगला नफा देणारे फळ मानले जाते.