Successful Farmer: भारतात अगदी शेती व्यवसायाच्या (Farming) प्रारंभीपासून मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय केला जात आहे. पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) हा शेतीशी संबंधित (Agri Business) असल्यामुळे हा व्यवसाय अल्पभूधारक शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आहे.

आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणात पशुपालन करत असतात. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पशुपालनात शेळी पालन (Goat Rearing) सर्वाधिक केले जाते. शेळी पालन कमी खर्चात करता येत असल्याने तसेच या व्यवसायासाठी अतिशय कमी जागा लागत असल्याने शेतकरी बांधव शेळीपालन व्यवसायाकडे अधिक आकृष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार, शेळी पालन व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी अधिक फायद्याचा ठरतो कारण की 18 शेळ्यांचे पालन केल्यास शेतकरी बांधवांना प्रतिमाह सव्वा दोन लाखांपर्यंत कमाई होऊ शकते.

तसेच 18 बोकड पालन करून प्रतिमाहं दोन लाखांपर्यंतची कमाई केली जाऊ शकते. मात्र असे असले तरी या व्यवसायात चढ-उतार हे होतच असते. शेतकरी बांधवांनी जर प्रगत शेळ्यांच्या जातींचे पालन केले तर निश्चितच त्यांना लाखोंची कमाई होऊ शकते. बिहार राज्यातील एका शेळीपालक शेतकऱ्याने शेळीपालन व्यवसायाच्या माध्यमातून चांगली कमाई करून दाखवली आहे.

मित्रांनो बिहार राज्यातील बेगूसराय येथील रहिवाशी विशाल रंजन हे एक उच्च शिक्षित तरुण. मात्र ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांना नोकरी मिळाली नाही. यामुळे या तरुणाने शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने या तरुणाने शेळीपालन व्यवसाय सुरू केला. शेळीपालन व्यवसायाने या तरुणाला स्वयंरोजगार तर दिलाच मात्र चांगली इन्कम देखील या व्यवसायातून त्याला होऊ लागली.

जाणकार लोकांचा सल्ला ठरला फायद्याचा 

विशाल यांनी ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांच्याकडे नोकरी नव्हती. नोकरींसाठी त्यांनी शोधाशोध केली मात्र नोकरी मिळाली नाही. म्हणून मग विशाल रंजनने 2014 मध्ये कृषी विज्ञान केंद्र, खोदवंदपूर, बेगुसराय यांनी आयोजित केलेल्या शेळीपालनाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. या प्रशिक्षणादरम्यान विशाल यांनी शेळीपालन व्यवसायातील बारकावे समजून घेतले.

मग काय कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी त्यांना गावातच शेळीपालन करण्याचा सल्ला दिला. या अनुषंगाने विशालने शेळ्यांसाठी गावातच एक फार्म बांधला. KVK ने विशाल यांना 40 शेळ्या दिल्या होत्या. या शेळ्या अर्ध्या मोकळ्या रानात आणि अर्ध्या स्टॉल फेड पद्धतीने पाळल्या जात होत्या. सुरुवातीच्या काळात विशालला व्यवसायाचा जास्त खर्च, शेळ्यांचा उच्च मृत्यू दर आणि त्यांची कमी किंमत मिळणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यामुळे विशाल यांना शेळीपालन व्यवसाय सुरुवातीला नकोसे झाला होता.

जात बदलल्याने फायदा झाला 

कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेळीपालन आणि भारतातील शेळ्यांच्या विपणनाच्या व्यावसायिकीकरणाच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून त्यांच्या फार्मला भेट दिली. शास्त्रज्ञांनी त्याला शेळ्यांची जात बदलण्याची सूचना केली. शास्त्रज्ञांनी त्यांना शुद्ध जातीचे प्राणी प्रजनन साठा म्हणून तयार करावे आणि प्रभावी विपणन धोरण अवलंबावे आणि दुवा वाढविण्यासाठी इतर शेतकऱ्यांशी मजबूत संबंध निर्माण करावेत असे सुचवले.

शेळ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी त्यांना KVK कडून तांत्रिक सहाय्यही देण्यात आले. विशाल रंजन यशस्वी झाला आणि शेळीपालन प्रकल्पांतर्गत शेळीपालन पद्धतीत बदल करून नफा कमवू लागला. त्यांनी KVK च्या शास्त्रज्ञांच्या सतत संपर्कात राहून शेळीपालनाशी संबंधित नवीन माहिती मिळवण्यासाठी सेमिनारमध्ये जावे.  आता शेळ्यांचा मृत्यूदरही वार्षिक 3 ते 8 टक्क्यांवर आला आहे.

40 शेळ्यांपासून सुरुवात केली आता 100 शेळ्या आहेत

त्यांनी केवळ 40 शेळ्यांपासून शेळीपालन व्यवसाय सुरू केला, परंतु आता त्यांच्याकडे 100 हून अधिक शेळ्या आहेत. शेतकऱ्यांना विकण्यासाठी तो शुद्ध जातीच्या शेळ्या पाळतो. सध्या शेळीपालनातून त्यांना वार्षिक 4 ते 6 लाखांचे उत्पन्न मिळत आहे, तर खर्च दीड ते दोन लाखांवर येतो. अशा प्रकारे तो 2-3 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत आहे. निश्चितच विशाल यांना शेळीपालन व्यवसाय फायद्याचा ठरला असून त्यांनी शेती पूरक व्यवसायात केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.