Successful Farmer : शेती (Agriculture) हा एक व्यवसाय असून यामध्ये इतर व्यवसायाप्रमाणे बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतकऱ्यांना (Farmer) फायदा होतो. मात्र हे जरी शास्वत सत्य असलं तरी देखील शेतकर्‍यांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने तसेच त्यांच्याकडे पुरेशी संसाधने उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना शेती व्यवसायात बदल करता येत नाही.

याशिवाय शेतीमध्ये बदल करताना रिस्क किंवा जोखीमही असतेचं मात्र शेतकरी बांधव जोखीम पत्करायला तयार नसतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव अजूनही पारंपारिक शेतीच्या कचाट्यात सापडलेला दिसतो. मात्र जर शेतीमध्ये बदल करण्याचं धाडस केलं तर निश्चितच शेतीतून लाखोंची कमाई (Farmer Income) होते.

परभणी जिल्ह्यातील (Parbhani) सेलू तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने हे दाखवून दिले आहे. सेलू तालुक्यातील मौजे तळतुंबा येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने जिरेनियम (Geranium Crop) या औषधी वनस्पतीच्या (Medicinal Crop) शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. जिरेनियम शेतीतून (Geranium Farming) या पठ्ठ्याने अवघ्या सहा महिन्यात दीड लाखांचे उत्पन्न घेतले असल्याने सध्या या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या बांधावर इतर शेतकरी गर्दी करत आहेत.

मौजे तळतुंबा येथील प्रयोगशील शेतकरी संभाजी घुगे यांनी जिरेनियम या औषधी वनस्पतीच्या शेतीतून लाखों रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. संभाजीराव यांच्याकडे एकूण 35 एकर बागायती शेतजमीन आहे. संभाजीराव इतर शेतकऱ्यांप्रमाणे आत्तापर्यंत पारंपारिक पीकांची शेती करत आले आहेत. मात्र पारंपरिक शेतीत संभाजीराव यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत होते.

मात्र त्यांचा मुलगा कृषी क्षेत्रात शिक्षण घेत असल्याने त्यांना शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि यंत्राची माहिती मिळू लागली. पुढे त्यांना जिरेनियम या औषधी वनस्पतीची माहिती मिळाली. मग काय या प्रयोगशील शेतकऱ्याने शेतीत बदल करायचा असं ठरवलं आणि जिरेनियम या औषधी वनस्पतीची शेती सुरू केली.

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की संभाजीराव यांच्याकडे 34 × 34 क्षेत्रफळ असलेले शेततळे देखील आहे. यामुळे त्यांची पाण्याची समस्या कायमची मिटली असून त्यांनी फळबाग लागवड केली आहे. त्याच्या जोडीला त्यांनी सोयाबीन या नगदी पिकाची देखील शेती केली आहे. सोयाबीन पिकात वेगवेगळे प्रयोग करत आहेत आणि त्यांना चांगली कमाई होत आहे. शिवाय त्यांनी जिरेनियम या औषधी वनस्पतीची देखील शेती सुरू केली आहे.

जिरेनियम शेती सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बारामती येथून संभाजीराव यांनी जिरेनियम ची रोपे मागवली आणि आपल्या दीड एकर क्षेत्रात जिरेनियम लागवड केली. जिरेनियम लागवड केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात जिरेनियम शेतीतून पहिले उत्पादन मिळाले. जिरेनियम शेतीतून केलेल्या पहिल्या काढणीत त्यांना 15 लिटर तेल मिळाले म्हणजेच जवळपास एक लाख 60 हजार रुपयांची कमाई झाली.

संभाजीरावं यांनी जिरेनियम तेल मुंबईच्या बाजारपेठेत विकले असून त्यांना 10,000 ते 12,000 रुपये प्रति लिटर असा दर मिळाला आहे. त्यामुळे त्यांना दीड एकर क्षेत्रात अवघ्या सहा महिन्यातचं दिड लाखांची कमाई झाली आहे. यामुळे या प्रयोगशील शेतकऱ्यांचा हा प्रयोग सक्सेसफुल ठरला असून इतर शेतकऱ्यांना यामुळे मार्गदर्शन मिळणार आहे.