Successful Farmer: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. आपल्या देशातील बहुतांशी जनसंख्या ही शेती (Farming) करते, आणि आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतात. काळाच्या ओघात देशातील शेतकरी बांधवांनी (Farmer) शेतीमध्ये मोठा अमूलाग्र बदल केला आहे.

आता शेतकरी बांधव पारंपरिक पीक पद्धतीला बगल दाखवत नवीन फळबाग तसेच नगदी पिकांची (Cash Crops) शेती करत आहेत. राजस्थान मधील एका शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत पारंपरिक पीक (Traditional Crops) पद्धतीला फाटा दाखवून शेतीतून लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. राजस्थान मधील श्री गंगानगरच्या पन्नीवाला जटान गावात राहणारे 12वी पास शेतकरी गोपाल सिहाग यांनी शेतीमध्ये बदल करत अंजीर शेतीतून (Fig Cultivation) लाखों रुपये उत्पन्न (farmer income) कमवून दाखवले आहे.

गोपाळरावं 10 वर्षांपासून मूग, गवार आणि मोहरी अशी पारंपरिक पिकांची शेती करत होते. मात्र या पारंपरिक पिकांच्या शेतीतून गोपाळ यांना काही खास कमाई मिळतं नव्हती. यामुळे त्यांना शेतीमध्ये बदल करायचा होता. गोपाळ दोन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मित्राच्या शेतात गेले होते. तेथे त्याला अंजीर लागवडीची माहिती मिळाली. मित्राने सांगितले की यातून 5 पट नफा मिळवता येतो. मग काय गोपाल सिहाग यांनी ठरवले की आपण देखील अंजीर लागवड करायचीचं.

मग या अनुषंगाने गोपाळ यांनी कृषी तज्ज्ञांशी बोलून याच्या शेतीची पद्धत जाणून घेतली, पण सर्वात मोठी चिंता होती ती विक्री करायची कशी? मग त्यांनी या प्रश्नाची शोधाशोध सुरू केली. आणि मग या प्रश्नाचे उत्तर सोशल मीडियावरून मिळाले. गोपालने सांगितले की, एकदा तो सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहत होता. एका व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल सांगितले जात होते.

असे दिसून आले की अनेक कंपन्या थेट शेतातून फळे खरेदी करतात. हे पाहता त्यांनी अंजिराची लागवड सुरू केली. कंत्राटी शेतीतून प्रथमच 4 लाखांहून अधिक नफा कमावला होता. यावेळी दुसऱ्या पिकातून 22 लाख रुपयांपर्यंत नफा मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे.

एका रोपावर 300 रुपयांपर्यंत येतो खर्च 

अंजीराची लागवड इतर फळांच्या लागवडीपेक्षा थोडी अधिक महाग आहे. मजूर, सेंद्रिय खत, स्प्रिंकलर पध्दत, ठिबक सिंचन इत्यादींचा खर्च जास्त आहे. अशा परिस्थितीत एका रोपावर सुमारे 300 रुपये उत्पादन खर्च येतो. परंतु, उत्पादन वाढले की उत्पन्नही वाढते.

श्रीगंगानगरच्या हवामानात उत्पादन शक्य

मित्रांनो गोपाळ यांच्या मते श्रीगंगानगर येथील हवामान अंजीर उत्पादनासाठी चांगले आहे. अंजीरासाठी उबदार हवामान आवश्यक आहे जे येथे आहे. या भागात हिवाळाही तीव्र असतो, मात्र हिवाळा येईपर्यंत अंजीराची फळे पिकतात आणि कंत्राटी शेती करणारी कंपनी ते विकत घेते. अंजीराची फळे 45 ते 50 दिवसांत पिकण्यास तयार होतात. यामध्ये शेतकऱ्याचेही नुकसान होत नाही. प्रक्रिया युनिट उभारल्यास ते शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते, असे ते सांगतात.

पिकल्यानंतर फळे थेट शेतातून विकले जातात

गोपाल सिहाग म्हणाले की, कंत्राटी शेतीमुळे येथील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी सर्वात मोठी अडचण अशी होती की, पीक तयार केल्यानंतर, हे फळ फार काळ शेतात किंवा झाडावर राहू शकत नाही. अंजीराचे फळ तोडल्यानंतर त्याची विक्री करणे आवश्यक आहे. फळे पिकल्यानंतर कंपनीचे वाहन शेतातूनच फळे गोळा करते. ते घेतात आणि अंतिम उत्पादन बनवतात. यासाठी फळे कंपनीच्या प्लांटमधील ड्रायरमध्ये वाळवून हलके दाबून ठेवली जातात, त्यानंतर पॅकिंग केले जाते.

6 बिघामध्ये अंजीर लागवड

गोपाल सिहाग यांच्याकडे 28 बिघे जमीन आहे. 6 बिघामध्ये अंजीराची झाडे लावली आहेत. दुसरीकडे 15 बिघामध्ये मूग, गवार आणि मोहरीची लागवड केली जात आहे. यातून दिड लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा मोहरीला 7 बिघामध्ये अडीच लाख, मूग एक लाख आणि गवारचे 50 हजार रुपये एवढं उत्पन्न मिळाल आहे.