Successful Farmer : रासायनिक खतांचा (Chemical Fertilizer) दिवसेंदिवस अंदाधुंद वापर वाढला असल्याने मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आता सेंद्रिय उत्पादनाची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेतीतून (Organic Farming) आता चांगली बक्कळ कमाई (Farmer Income) होत आहे.

देशात आणि जगामध्ये सेंद्रिय उत्पादनांची मागणी वाढत आहे, हे पाहता भारतातील अनेक शेतकरी रसायनमुक्त सेंद्रिय शेती करत असून या शेतकऱ्यांच्या उत्पादनांनाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या शेतमालास अधिक बाजार भाव मिळत असल्याने सेंद्रिय शेती आता शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. उत्तर प्रदेश मधल्या गाजीपुर जिल्ह्यातील मौजे करीमुद्दीनपूरच्या पंकज राय या प्रयोगशील शेतकऱ्याने देखील सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून लाखोंची कमाई करून दाखवली आहे.

या शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकवलेल्या सेंद्रिय भाज्या (Organic Vegetable) चांगल्या बाजारभावात बिट्रेन आणि युरोपियन देशांमध्ये निर्यात केल्या जात आहेत. अशाप्रकारे सेंद्रिय शेती करून पंकज राय वर्षभरात 8 ते 10 लाखांचा नफा कमावत आहेत. इतकंच नाही तर प्रगतीचा मार्ग अवलंबत आता पंकज राय इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेवर काम करत आहेत. यामुळे सध्या पंकज दादांची चांगलीच चर्चा रंगली आहे.

आधुनिक तंत्राने करतोय सेंद्रिय शेती

मित्रांनो, रासायनिक खतांचा वापर केल्याने शेतजमिनी नापीक बनत चालली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत प्रगतीशील शेतकरी पंकज राय यांनी तीन वर्षांपूर्वी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनास (Vegetable Farming) सुरवात केली आहे. सेंद्रिय शेती सुरु करण्याच्या अनुषंगाने त्यांनी 2500 चौरस मीटर परिसरात पॉलीहाऊस लावून सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली. या साठी पंकज यांना सुमारे 30 लाख रुपये खर्च आला आहे. एकदा 30 लाख रुपये गुंतवणूक करून दरवर्षी त्यांना 8 ते 10 लाखांचा नफा मिळू लागला आहे.

कोविड-19 मध्ये लंडनला रवाना झाल्या पंकज दादाच्या सेंद्रिय भाज्या

मित्रांनो कोरोना महामारीच्या काळापासून सेंद्रिय भाजीपाल्याला मोठा डिमांड आला आहे. पंकज दादा यांना कोरूना महामार्ग च्या काळात यामुळे मोठा फायदा झाला आहे. खरं पाहता कोरोना महामारीच्या काळात अनेक शेतकर्‍यांची पिके बाजारात पोहोचू शकली नाहीत. त्या वेळी पंकज राय यांनी सरकारच्या APEDA या संस्थेच्या मदतीने लंडनच्या बाजारपेठेत 10 टन करवंद आणि 1 क्विंटल हिरवी मिरची निर्यात केली.

पॉलिहाऊसमध्ये स्ट्रॉबेरी आणि काश्मिरी केशरची लागवड

आज पंकज राय शेतीच्या आधुनिक तंत्राने सेंद्रिय शेती करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंकज राय यांनी सांगितले की त्यांची टीम जुलै ते ऑगस्ट दरम्यान फळे आणि भाज्यांची रोपवाटिका तयार करते. एवढेच नाही तर सप्टेंबर महिन्यात पॉलिहाऊसमध्ये स्ट्रॉबेरी आणि काश्मिरी केशर पिकवले जाते. याशिवाय त्यांच्या फार्म हाऊसवर मिरची, टोमॅटो, वांगी या भाज्यांची रोपे तयार केली जातात, त्यापैकी 25 टक्के रोपे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जातात.

आपल्या महाराष्ट्रातून कल्पना सुचली 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रगतीशील शेतकरी पंकज राय यांना त्यांच्या पुणे भेटीदरम्यान आधुनिक पद्धतीने सेंद्रिय शेती करण्याची कल्पना सुचली. त्यावेळी पंकज राय आपल्या सेंद्रिय उत्पादनांच्या पुरवठ्याशी संबंधित माहिती घेण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचा असा विश्वास आहे की सेंद्रिय शेतीमध्ये रसायनांवर खर्च होत नाही, त्यामुळे खर्च कमी आणि नफा अनेक पटींनी वाढतो.

होम डिलिव्हरी सुविधा सुरु केली 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोक प्रगतीशील शेतकरी पंकज राय यांच्या फार्म हाऊसमधून फळे आणि भाज्या खरेदी करतात. एवढेचं नाही तर त्यांच्या परिसरात ते सेंद्रिय भाजीपाला होम डिलिव्हरीच्या माध्यमातून लोकांच्या घरापर्यंत पोहचवत आहेत. पंकज यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी पाहण्यासाठी त्यांच्या बांधावर अनेक शेतकरी हजेरी लावत असतात. निश्चितच पंकज यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी इतरांना प्रेरणा देणाऱी आहे.