Successful Farmer: यशस्वी होण्यासाठी शिक्षण नाही तर त्यासाठी केलेली मेहनत आणि जिद्द अतिशय महत्त्वाचे असते. यशाला गवसणी घालण्यासाठी जर योग्य नियोजन आखून रात्रीचा दिवस केला तर निश्चितच यश हे प्राप्त केले जाऊ शकते. मग ते कोणतेही क्षेत्र असो, माणूस यशस्वी होतोच. अक्षरशा शेतीचे (Farming) देखील क्षेत्र असले तरीदेखील कठोर मेहनत घेऊन यशाला गवसणी घालता येते.

खरे पाहता शेतीचे क्षेत्र (Agriculture News) हे अनिश्चिततेचे आहे मात्र असे असले तरी योग्य नियोजन आखून या अनिश्चिततेच्या क्षेत्रातून देखील करोडो रुपयांची कमाई सहज रित्या केली जाऊ शकते. राजस्थान मधील एका आठवी पास मजुराने देखील शेतीमध्ये योग्य नियोजन आखून तब्बल एक कोटी रुपयांची कमाई (Farmer Income) करण्याची किमया साधली आहे. राजस्थान मधील जालोर जिल्ह्याच्या मौजे पालडी येथील भावाराम याच्या एका आयडियाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे.

खरं पाहता भावाराम गुजरात (Gujarat) मधील अहमदाबाद येथे मजुरीसाठी वास्तव्यास होते. मजुरी करताना अपार कष्ट घेऊन देखील जेमतेम पोटाची खळगीचं भरत होती. यामुळे अनेकदा भावाराम नोकरी सोडण्याचा विचार करत मात्र जर ही नोकरी सोडली तर करायचे काय असा मोठा प्रश्न भावाराम यांच्या पुढ्यात उभा होता. अशा परिस्थितीत आपल्या विचारांना जागीच दाबून ठेवून भावाराम मोठे कष्टाचे काम करत होते.

मात्र मागील वर्षी त्यांना सुचलेल्या एका भन्नाट आयडिया मुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. खरं पाहता एके दिवशी भावाराम आपल्या मोबाईलवर युट्युबचे व्हिडिओज पाहत होते. अशातच त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून तैवानच्या रेडलेडी जातीच्या पपईच्या लागवडीची (Papaya Farming) माहितीचा व्हिडिओ गावला. यूट्यूबवर (Youtube) तैवानी रेडलेडी जातीचे आणखी काही व्हिडिओ पाहिल्यानंतर कळले की ही सर्वात कमी खर्चात सर्वात फायदेशीर शेती आहे. ही जात पपईच्या पहिल्या तीन जातींमध्ये येते.

भावारामने गुजरातमध्ये चौकशी केली तेव्हा त्याला माहिती मिळाली की, तैवान प्रकारची पपई इथे मिळतात. भावारामने ठरवले की, काहीही झाले तरी आता तैवानच्या पपईची लागवड करायची आहे. तो गावात परतला आणि 25 रुपये प्रति रोप या दराने 2500 रोपे मागवली. जून-जुलै 2021 मध्ये त्यांच्या 2.35 हेक्टर जमिनीवर तैवान रेडलेडी जातीच्या पपईची लागवड सुरू केली. ठिबक प्रणाली आणि सेंद्रिय खताच्या मदतीने ते तयार करण्यात आले. अवघ्या 6 महिन्यांत उत्पादन सुरू झाले. एका वर्षभरात भावारामचे नशीब पालटले. आतापर्यंत त्यांनी एक कोटी रुपयांची पपई विकली आहे.

बाजारात भाव मिळाला नाही तर घरपोच विक्री

भावारामने पपई बाजारात विकण्यासाठी कॉन्टॅक्ट केला मात्र चांगला भाव काही मिळाला नाही मग काय या पट्ठ्याने घराजवळच पपईची विक्री सुरू केली. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये पपई भरून रस्त्याच्या कडेला उभे राहायचे आणि पपईची विक्री करायची. जेव्हा लोकांना त्याची चव आवडू लागली तेव्हा त्याची एका दिवसात 5 क्विंटलपर्यंत पपई विकली जाऊ लागली. आता जालोर जिल्ह्यात त्याची पपई ‘भावारामची पपई’ या नावाने विकली जात आहे. निश्चितच भावाराम यांनी शेतीमध्ये केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असून यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळणार आहे.