Successful Farmer : भारतात गेल्या अनेक वर्षांपासून शेतीमध्ये (Farming) मोठा बदल केला जात आहे. मराठवाड्यातून देखील असंच एक साजेस उदाहरण समोर येत आहे. दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad) कळंब तालुक्याच्या एका दहावी नापास शेतकरी (Farmer) पुत्राने देखील शेतीमध्ये बदल करून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करून दाखवली आहे.

कळंब तालुक्याचे मौजे नाथ वाडी येथील प्रयोगशील शेतकरी बाळकृष्ण साळुंखे यांनी शेतीमध्ये बदल करत ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून (Dragon Fruit Farming) लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या या दहावी नापास शेतकरी पुत्राची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

बाळकृष्ण साळुंखे यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Crop) या विदेशी समजल्या जाणाऱ्या फळाची लागवड करत वर्षाकाठी आठ लाखांची कमाई करून दाखवली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की बाळकृष्ण यांनी जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे विशेष म्हणजे ते दहावीत नापास झाले आहेत. मात्र असे असले तरी शेती व्यवसायात शंभर टक्के गुणांनी पास झाले आहेत. या अवलिया दहावी नापास शेतकऱ्याने काळाच्या ओघात बदल करत आपल्या एक एकर शेत जमीन येथील ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, 2018 मध्ये बाळकृष्ण यांनी आपल्या एका एकरात 10×10 च्या अंतरावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. म्हणजे बाळकृष्ण यांनी पाच वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुट ची शेती सुरू केली आहे. ड्रॅगन फ्रुट फळबागेत यांनी सोयाबीन उडीद यांसारखी आंतरपिके देखील घेतलीत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. 2018 मध्ये त्यांना एका एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी साडेचार लाखांचा खर्च आला होता.

विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट हे नवखे फळपीक असून देखील बाळकृष्ण यांनी यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. फक्त युट्युबवर व्हिडीओ बघत त्यांनी ड्रॅगन फ्रुट शेतीची माहितीची जमवाजमव केली आणि आजच्या घडीला यशस्वी ड्रॅगन फ्रुट उत्पादक ते बनले आहेत. बाळकृष्ण यांच्या मते एकदा की या झाडाला फळे लागायला सुरुवात झाली की सहा महिने फळे येतात.

बाळकृष्ण यांनी एका एकरात बाराशे रुपयांची लागवड केली असून त्यांना सहा ते सात टन ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन यातून मिळते. सहा ते सात टन ड्रॅगन फ्रुट विकून त्यांना जवळपास सात लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो बाळकृष्ण यांची जमीन ही सोलापूर धुळे महामार्ग लगत आहे.

यामुळे बाळकृष्ण यांना याचा फायदा होत आहे. ड्रॅगन फ्रुटची बाग महामार्गावरून दिसत असल्याने अनेक प्रवासी व वाटसरू येथे थांबून त्यांच्या बांधावरच ड्रॅगन फ्रुटची खरेदी करतात. बाळकृष्ण यांच्या मते दिवसाला 20 ते 22 किलो ड्रॅगन फ्रुट जागेवरच विक्री होत असल्याने त्यांना याचा मोठा फायदा होत असून हात खर्चाला रोजच्या रोज पैसे उपलब्ध होत आहेत. शेतात दहावी नापास शेतकरी पुत्राची ही फिनिक्स भरारी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारी सिद्ध होणार आहे.