Success Story: शेती (Farming) खरे पाहता एक बारामाही व्यवसाय (Business) आहे. मात्र बारामाही चालणारा हा व्यवसाय कायमच अनिश्चिततेचा व्यवसाय म्हणून ओळखला जातो. शेती व्यवसायात अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) तसेच शेतीमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे शेतकरी बांधवांना (Farmer) नुकसानीचा सामना करावा लागतो.

या परिस्थितीत जाणकार लोक शेतकरी बांधवांना शेती वर विसंबून न राहता शेती समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agri Business) करण्याचा सल्ला देतात. मित्रांनो खरे पाहता शेतीपूरक व्यवसाय शेतकरी बांधवांसाठी नवसंजीवनीचंच काम करतात. कारण की शेती पूरक व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळवता येते. मात्र असे असले तरी यासाठी योग्य नियोजन हे महत्वाचे आहे.

राजस्थान मधील भरतपुर जिल्ह्यातील कामा तालुक्याच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील शेतीपूरक व्यवसायातून लाखोंची कमाई (Farmer Income) करून दाखवली आहे. 55 वर्षीय निहाल सिंह यांनी पारंपरिक शेतीत सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती पूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि मत्स्य पालन (Fish Farming) करून आजच्या घडीला करोडो रुपयांची प्रॉपर्टी कमावण्याची किमया साधली आहे.

मित्रांनो निहाल सिंह मौजे तरगोतरा उंधन गांव येथील रहिवासी शेतकरी आहेत. निहाल सिंह यांनी आपल्या वयाच्या 35 व्या वर्षापासून मत्स्य पालन व्यवसाय सुरू केला आहे आणि आजच्या घडीला त्यांचे वय 55 वर्षे आहे म्हणजेच जवळपास वीस वर्षांपासून निहाल सिंग मत्स्यपालन व्यवसायात आहेत आणि यातून चांगली कमाई देखील त्यांना होत आहे.

निहाल सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, भावा-भावांची वाटणी झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला 5 बिघे जमीन आली. त्यांचे कुटुंब देखील मोठे होते. अशा परिस्थितीत पारंपरिक शेतीतून त्यांना फारसा नफा मिळत नव्हता. त्यांना उदरनिर्वाह कसा करायचा याचीच काळजी वाटायला लागली.

मग काय त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितल्यावर त्यांनी मत्स्यपालनाची कल्पना दिली. मत्स्यपालनाची पद्धतही मित्रांनी सांगितली. मत्स्यपालन सुरू केल्यानंतर हळूहळू नफा मिळू लागला. नफा वाढत असल्याचे पाहून गावातील शासकीय तलाव कंत्राटावर घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना पहिल्यांदा 6 लाख रुपयांची कमाई मत्स्यपालन व्यवसायातून झाली होती.

दिल्ली आणि फरीदाबाद मंडीला पुरवठा

निहाल सिंग यांचे मासे दिल्ली आणि फरीदाबाद येथील मंडई मध्ये विक्रीसाठी पाठवली जात आहेत. भरतपूरच्या बाजारातून देखील व्यापारी स्वतः त्यांच्याकडे येतात. आकारानुसार माशांना मागणी असते. व्यापाऱ्यांना आवडणाऱ्या माशांच्या आकारानुसार ते तलावातून बाहेर काढतात. तलावात प्रत्येक वजनाचे मासे आढळतात. त्यांच्या वजनानुसार किंमत ठरवली जाते.

मत्स्यपालनातून मिळालेल्या नफ्यातून 7 बिघे जमीन खरेदी केली, मुलांची लग्ने करून दिली

निहाल यांना तीन मुली आणि दोन मुलं आहेत. मत्स्यपालनातून मिळालेल्या नफ्याने त्यांनी तिन्ही मुलींची लग्ने लावली. मोठा मुलगा फरिदाबाद येथे नोकरी करतो आणि लहान मुलगा अजूनही शिकत आहे. इतकंच नाही तर शेती करताना 7 बिघे जमीन आधीच विकत घेतली आहे.  आता त्यांच्याकडे 12 बिघे जमीन आहे. त्याची आजची किंमत एक कोटींहून अधिक आहे. आता दुसऱ्या तलावात मत्स्यपालन सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.

माशांसाठी सुरक्षारक्षक तैनात आहेत

त्यांच्या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. तलावात पाणी भरण्यासाठी त्यांनी तलावाजवळ बोअरिंग लावले. मासे मोठे झाले की चोरीची भीतीही असते. सध्या तलावात 10 लाखांचे मासे आहेत. त्यामुळे तलावाची काळजी घेणे गरजेचे आहे.  यासाठी त्यांनी दोन रक्षक नेमले आहेत, जे त्यांच्यावर 24 तास लक्ष ठेवतात.