Success Story : मित्रांनो अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून (Farming) दुरावत असल्याचे चित्र आहे. शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि शेतीऐवजी (Agriculture) एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहत आहेत.

मात्र असे असले तरी आपल्या देशात असे अनेक उच्चशिक्षित लोक आहेत जे अलीकडे शेती व्यवसायाकडे (Farming Business) मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहेत. विशेष म्हणजे हे उच्चशिक्षित लोक शेतीमधून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत सिद्ध होत आहेत. मित्रांनो उत्तर प्रदेश राज्यात देखील असचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश राज्यात व्यवसायाने शिक्षक असलेल्या एका अवलियाने मुलांना शिक्षण देण्याबरोबरच शेती व्यवसायात हात आजमावला आहे.

विशेष म्हणजे शेती व्यवसायात या अवलिया शिक्षकाला चांगली कमाई देखील होऊ लागली आहे. यामुळे सध्या हे उत्तर प्रदेश मधील गुरुजी संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहेत. मित्रांनो मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेश मधील या अवलिया शिक्षकाला आपल्या नोकरीतून जेवढी कमाई होत आहे त्याच्या कितीतरी अधिक पटीने कमाई शेती व्यवसायातून होत आहे. बाराबंकी जिल्ह्यातील दौलतपूर गावात राहणारे अमरेंद्र प्रताप सिंह या शिक्षकाने नोकरी सोबतच शेती सुरू केली आहे.

शेती व्यवसायाच्या आपल्या सुरुवातीच्या काळात गुरुजी अमरेंद्र प्रताप सिंग शाळेतील मुलांना शिकवून वार्षिक 1.20 लाख रुपये कमवायचे. मात्र आता त्यांना शेतीतूनच वर्षाला 30 लाख रुपये मिळत आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून सुमारे दीड तासाच्या अंतरावर राहणारे अमरेंद्र प्रताप सिंह आपल्या परिसरात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना चांगल्या शेतीसाठी मार्गदर्शन करत आहेत. मित्रांनो 2014 मध्ये उन्हाळ्याच्या सुटीत त्यांनी आपल्या 30 एकर शेतीला सुरुवात केली होती.

YouTube व्हिडिओ आणि ऑनलाइन ट्यूटोरियलने शिकवले शेतीतले धडे

सुरुवातीला, गुरुजी अमरेंद्र प्रताप सिंग यांनी काही YouTube चॅनेलवरून व्हिडिओ पाहिले आणि ऑनलाइन ट्यूटोरियलच्या मदतीने योग्य पद्धतीने शेतीबद्दलची आपली समज विकसित केली. यानंतर त्यांनी एक एकर जमिनीवर केळीची लागवड सुरू केली. साधारणपणे त्यांच्या भागातील शेतकरी फक्त ऊस, भरड तृणधान्ये आणि गहू पिकवतात. परंतु, या पिकांमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत नाही. ऊस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना दोन वर्षे गुंतवणूक करावी लागते. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही.

शेतीची सुरूवात कशी केली ?

अमरेंद्र यांना प्रयोग म्हणून केलेल्या केळीच्या लागवडीचा काहीसा फायदा झाला. मग काय पुढच्या वर्षी केळीच्या शेतातच हळद, आले आणि फ्लॉवरची आंतरपीक घेण्याचे त्यांनी ठरवले. आल्याचा त्यांना फारसा फायदा झाला नाही, पण हळदीने अमरेंद्रला कमाईची चांगली संधी दिली. यामुळे त्याने एवढी कमाई केली की केळीत गुंतवलेले पैसे त्याच्याकडे परत आले. त्यामुळे केळीच्या विक्रीतून त्यांना निव्वळ नफा झाला.

आंतरपीक घेण्याचे फायदे

केळीच्या लागवडीत यश मिळाल्यानंतर अमरेंद्र यांनी टरबूज, खरबूज आणि बटाट्यावर असेच काही प्रयोग केले. अनेक प्रकारच्या शेतीबद्दल समज विकसित करण्यासाठी, youtube व्हिडिओ बघितले आणि शेतीमधलं आपलं ज्ञान अधिक चांगल्या प्रकारे विकसित केले. यानंतर त्यांनी स्ट्रॉबेरी, सिमला मिरची आणि मशरूमची लागवडही सुरू केली आहे.

आता 60 एकर क्षेत्रावर करतात शेती

इतक्या वर्षांच्या अनुभवाने आता अमरेंद्र पिकाच्या कचऱ्यापासून खतही बनवतात. अशा प्रकारे, शेतातील कचरा त्यांच्या शेतीसाठी खत म्हणून काम करतो. वेगवेगळ्या ऋतूंनुसार ते पिके फिरवत राहतात. तसेच आंतरपीक तंत्रज्ञानातून त्यांना चांगला नफा मिळतो. अमरेंद्र आता 60 एकरात शेती करतो. यातील 30 एकर ही त्यांची स्वत:ची जमीन असून तीस एकर भाडेतत्त्वावर घेतली आहे. धणे, लसूण ते मक्यापर्यंत ते पीक घेतात.

एक कोटी रुपयांच्या व्यवसायात 30 लाख वार्षिक बचत

अमरेंद्र प्रताप सिंग आपल्या 30 एकर जमिनीत भाजीपाला पिकवतात, तर उर्वरित 30 एकर जमिनीत ऊस, गहू आणि इतर भरड धान्य पिकवतात. या जमिनीतून त्यांना दरवर्षी एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. यातून त्यांचा नफा 30 लाख रुपये आहे. कालांतराने ते आता सिंचनासाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ठिबक आणि स्प्रिंकलर व्यतिरिक्त, मातीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग तंत्र देखील वापरले जाते.