Soybean Farming: सध्या राज्यात सर्वत्र पावसाने (Rain) अक्षरश थैमान माजवला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सध्या स्थितीला पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे वातावरण व ढगाळ वातावरण कायम आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामातील (Kharif Season) मुख्य पिकांवर रोगांच सावट बघायला मिळत आहे.

सोयाबीन (Soybean Crop) या नगदी पिकावर (Cash Crop) देखील हवामानात झालेल्या बदलामुळे (Climate Change) विपरीत परिणाम बघायला मिळत आहे. मित्रांनो खरे पाहता महाराष्ट्रात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अशा परिस्थितीत बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या पिकावर अवलंबून असते.

मात्र सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन या पिकावर येणाऱ्या एका प्रमुख रोगाची माहिती आणि नियंत्रण पद्धती (Soybean Pest Control) घेऊन हजर झालो आहोत.

मित्रांनो आज आपण तांबेरा या सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या आजाराच्या नियंत्रण पद्धती (Soybean Crop Management) विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिकावर येणाऱ्या तांबेरा रोगाविषयीं आणि तांबेरा रोगाच्या नियंत्रणाबाबत.

सोयाबीन पिकासाठी घातक ठरणारा तांबेरा रोग 

जाणकार लोकांच्या मते, सोयाबीन पिकावर तांबेरा हा रोग सतत पडणाऱ्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रसार होतो.

तांबेरा रोगांमध्ये सोयाबीन पिकाच्या पानांवर फिकट लालसर ते गर्द लालसर रंगाचे चट्टे पडतात. पानांच्या मागील बाजूस लालसर, तपकिरी रंगाचे पुरळ दिसून येतात. अशा पुरळांवर लालसर रंगाची पावडर जमा झालेली दिसून येते.

सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा या रोगामुळे सोयाबीन पिकाची वाढ मंदावते, शिवाय सोयाबीन पिकाची पाने गळतात. यामुळे सोयाबीन पिकावर विपरीत परिणाम होतो आणि उत्पादनात भली मोठी घट होते.

असे सांगितले जाते की, सोयाबीन पिकावर या रोगाची तीव्रता जास्त असल्यास झाडांची मोठ्या प्रमाणात पानगळ होऊन शेंगा पोचट व दाणे चपटे राहतात. निश्चितचं यामुळे सोयाबीन पिकाचा दर्जा खालावतो. जाणकार लोकांच्या मते या रोगामुळे सोयाबीनच्या उत्पादनात 50 ते 80 टक्क्यांपर्यंतची लक्षणीय घट होते.

सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या तांबेरा रोगाचे व्यवस्थापन:-

जाणकार लोकांच्या मते, या रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी नेहमी रोग प्रतिबंधक जातीची लागवड करावी असा सल्ला दिला जातो. या रोगासाठी प्रतिबंधात्मक म्हणून फुले कल्याणी (डी. एस.228), फुले अग्रणी (के.डी. एस.344) व फुले संगम(के.डी. एस.726) या वाणांची शिफारस विद्यापीठांकडून केली जाते. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोक देखील या जातींच्या सोयाबीनची लागवड करण्याचा सल्ला देतात.

याशिवाय जाणकार लोक शेतकरी बांधवांना सल्ला देताना सांगतात की, या रोगाच्या प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी लवकर म्हणजे 15-25 मे च्या दरम्यान करावी. त्यामुळे तांबेरा रोग येण्याच्या आधी पिक परिपक्व होऊन येणाऱ्या रोगापासून बचाव होतो. 

तसेच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोपीकोण्याझोल 25% प्रवाही 10 मिली. किंवा हेक्झाकोण्याझोल 5 % प्रवाही 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मित्रांनो आम्ही इथे नमूद करू इच्छितो की, आम्ही दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधांची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.