Soybean Farming: सोयाबीन (Soybean crop) खरीप हंगामातील (Kharif season) एक मुख्य पीक आहे. संपूर्ण भारतात सोयाबीनची कमी-अधिक प्रमाणात लागवड बघायला मिळते. आपल्या राज्यात देखील सोयाबीनची शेती विशेष उल्लेखनीय आहे.

राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात आणि चांगले उत्पन्न (Farmer income) देखील कमावतात. खरं पाहता सोयाबीन एक नगदी पीक (cash crop) असल्याने शेतकरी बांधवांना (Farmer) यातून चांगली कमाई होते. भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

महाराष्ट्र भारतात सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. म्हणजेच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी आणि मुख्य पिकावर अवलंबून आहे. सोयाबीन पीक एक हमीचे पीक असले तरी देखील पीक व्यवस्थापन (soybean crop management) करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पिकावर घातक ठरणाऱ्या एका रोगाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आज आपण मूळकूज तसेच खोड कूज या सोयाबीन साठी घातक ठरणाऱ्या आजारावर कशा पद्धतीने नियंत्रण (soybean disease) मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

सोयाबीन साठी घातक ठरणाऱ्या मूळकुज/खोडकुज (चारकोल रॉट) रोगाची लक्षणे जाणून घ्या बरं…!

जाणकार लोकांच्या मते, मूळकुज/खोडकुज हा रोग जमिनीत पाण्याचा अभाव असल्यास प्रामुख्याने बघायला मिळतो. तसेच अधिक तापमान म्हणजे तीस अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असल्यास हा रोग अधिक आढळतो. तसेच असे असे वातावरण या रोगाच्या प्रसारास अनुकूल असते.

पॅचेसमध्ये खुजे किंवा कोमजलेली झाडे हे या रोगाचे प्रारंभिक लक्षण असल्याचे जाणकार लोक स्पष्ट करतात.

या रोगात सोयाबीन पिकाच्या खोडावर, मुळावर भुरकट काळपट डाग दिसतात. यामुळे संपूर्ण झाड राखाडी रंगाचे होते. या रोगामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात कमालीची घट होत असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत या रोगावर वेळीच नियंत्रण (soybean pest control) मिळवणे अतिशय आवश्यक असते.

मूळकुज/खोडकुज (चारकोल रॉट) नियंत्रण

या रोगावर अद्यापही प्रभावी असे औषध उपलब्ध नाही. यामुळे या रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शेतकरी बांधवांनी नेहमीच रोगप्रतिरोधक जातींची पेरणी करावी असा सल्ला दिला जातो. तसेच शेतकरी बांधवांनी बियाण्यावर प्रक्रिया करूनच बियाण्याची पेरणी केली पाहिजे असा सल्ला जाणकार लोक देत असतात.

बिजोपचार करण्यासाठी शेतकरी बांधव बुरशीनाशक म्हणून मेफेनोक्झॅम आणि मेटालॅक्झिल याचा वापरले करू शकतात. तसेच काही शेतकरी बांधव दावा करतात की, सोयाबीनच्या पानांवर रोगाची लक्षणे दिसू लागल्यास टेब्युकोनाझोल @ 250 मिली @ 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास रोगावर नियंत्रण मिळवता येते. मित्रांनो मात्र त्यासाठी प्रभावी असे कोणतेच औषध उपलब्ध नसल्याने हा दावा कितपत खरा आहे हे सांगणे थोडं अशक्य आहे.

मित्रांनो येथे दिलेली माहिती कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही. शेतकरी बांधवांनी कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.