Soybean Farming : भारतात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. सोयाबीन (Soybean Crop) हे देखील असाच एक प्रमुख तेलबिया पीक असून त्याला नगदी पिकाचा (Cash Crop) दर्जा प्राप्त आहे.

या पिकाची शेती देशात मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असते. अशा परिस्थिती जाणकार लोक सोयाबीनच्या पिकाकडे अधिक लक्ष ठेवण्याचे आवाहन करत आहेत. मित्रांनो मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रात देखील येलो मोजेक रोग सोयाबीन पिकावर आला असून यामुळे सोयाबीन पीक संकटात सापडले आहे.

जाणकार लोकांच्या मते या रोगावर वेळीच नियंत्रण (Soybean Crop Management) मिळवले नाही तर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट घडून येऊ शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर आलेल्या येलो मोजॅक रोगाचे (Yellow Mosaic Disease) कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

पिवळा मोज़ेक रोग म्हणजे काय

पिवळ्या मोझॅक रोगाने बाधित पिकावर गडद हिरवट-पिवळे ठिपके दिसतात. त्यामुळे झाडांचा रंग पिवळसर होऊन झाडे मऊ होऊन आकुंचित होऊ लागतात किंवा कोमेजू लागतात. हळुहळु हा रोग संपूर्ण पिकावर पसरतो आणि काही वेळा आजूबाजूच्या शेतातील पिके देखील त्याला बळी पडतात. या रोगामुळे फळधारणा चांगली होतं नाही. यामुळे राज्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संपूर्ण पीक नष्ट करावे लागत आहे.

पिवळा मोज़ेक रोगावर उपाय 

मित्रांनो पिवळा मोजॅक हा रोग प्रामुख्याने पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. अशा परिस्थितीत सर्वप्रथम पांढऱ्या माशीवर नियंत्रण मिळवावे लागणार आहे. यामुळे या रोगाची लक्षणे दिसताच पिकाच्या मध्यभागी 3 ते 4 पिवळे चिकट सापळे हेक्टरी 3 ते 4 या प्रमाणात लावावेत.

काही झाडांवरच संसर्ग झाल्यास रोगग्रस्त झाडे उपटून दूरवर नेऊन खड्ड्यात गाडून टाकावीत.

अशा समस्या टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या नवीन विकसित, सुधारित आणि रोग प्रतिरोधक वाणांची पेरणी करण्याचा सल्ला दिला जातो.

या रोगामुळे शेतकऱ्यांना हवे असल्यास ते कडुनिंब आणि गोमूत्रापासून बनवलेल्या कडुनिंब-गौमुत्र सेंद्रिय कीटकनाशकाची फवारणीही करू शकतात.

कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, इमिडाक्लोप्रिड, थायमेथोक्झाम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन हेक्टरी 125 मिली कीटकनाशके फवारणी केली जाऊ शकतात.