Soybean Farming: मित्रांनो सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) सध्या खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन (Crop Management) करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.

राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामात सोयाबीन या (Soybean Crop) मुख्य पिकाचे मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. मित्रांनो सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक असून एक नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते. नगदी पिकं असल्यामुळे सोयाबीनची शेती शेतकरी बांधवांना नफ्याचा सौदा सिद्ध होत आहे.

मात्र असे असले तरी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन (Soybean crop management) करणे देखील अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो सोयाबीन पिकावर इतर पिकांप्रमाणेच विविध प्रकारच्या कीटकांचे सावट बघायला मिळते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकावर येणाऱ्या किटकांवर वेळेवर नियंत्रण (Soybean Pest Control) मिळवावे लागते, नाही तर उत्पादनात घट होण्याचा धोका असतो.

अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पिकावर प्रामुख्याने प्रादुर्भाव असणाऱ्या दोन कीटकांची माहिती तसेच त्यावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या स्टेम बोरर आणि पांढरी माशी या दोन कीटकांच्या नियंत्रणाविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

स्टेम बोअरर (डेक्टिस टेक्सन्स)

नुकसानाचा प्रकार – देठाच्या मध्यभागी छिद्र करून अळ्या देठावर आपली उपजीविका भागवत असतात. हे कीटक सरळ देठावर आक्रमण करत असल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे उत्पादनात मोठी घट नमूद करण्यात येते. अशा परिस्थितीत या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक असते.

कीड व्यवस्थापन किंवा नियंत्रण – ट्रायझोफास 40 EC  1 लिटर प्रति हेक्टर किंवा प्रोपेनाफॉस 40% EC + सायपरमेथ्रिन 4% EC 1 लिटर प्रति हेक्‍टरी 600 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पांढरी माशी (बेमिसिया टेबाकी)

नुकसानाचा प्रकार – सोयाबीन पिकावर प्रामुख्याने आढळणारे हे कीटक सोयाबीनच्या पानांचा रस शोषून घेतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात. मित्रांनो जाणकार लोकांच्या मते, या किडीमुळेच पिवळा मोझॅक रोग पसरतो. अशा परिस्थितीत या कीटकांवर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

कीड व्यवस्थापन किंवा नियंत्रण – या कीटकाच्या संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर पिवळी पडलेली पाने काढून टाका आणि गाईच्या गौऱ्यापासून तयार झालेल्या राखेने डस्टिंग करण्याचा सल्ला दिला जातो.

थायोमेथॅक्सम 25 w g. संसर्गाच्या पातळीनुसार हेक्टरी 80 ते 100 ग्रॅम या प्रमाणात फवारणी करावी.

प्रिमिक्स्ड बीटासिफ्लुथ्रिन 49 + इमिडाक्लोप्रिड 19.81% O.D. 350 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी.

प्रिमिक्स थायोमेथोक्सॅम + लॅम्बडासिलहॅलोथ्रीन 125 मिली प्रति हेक्टर दराने फवारणी केल्याने पांढऱ्या माशी तसेच पाने खाणाऱ्या कीटकांचे नियंत्रण होते.

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही अंतिम कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.