Soybean Farming: राज्यात खरीप हंगामातील (Kharif Season) पिके आता जोमाने वाढीसाठी तयार होत आहेत. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे सोयाबीन हे एक खरीप हंगामातील मुख्य पीक (Soybean Crop) आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी (Farmer) सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण सोयाबीन पिकाचे (Soybean Cultivation) व्यवस्थापन कशा पद्धतीने झाले पाहिजे जेणेकरून शेतकरी बांधवांना चांगला फायदा (Farmer Income) मिळू शकतो याविषयी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो सोयाबीन पिकाला वातावरणाच्या बदलाचा मोठा फटका बसत असतो.

अशावेळी सोयाबीन पिकात पीक व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक असते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकावर कायम लक्ष ठेवून असावे आणि कीटक किंवा रोगांचा प्रादुर्भाव दिसताच क्षणी कृषी तज्ज्ञच्या सल्ल्याने योग्य ती उपाय योजना करावी जेणेकरून उत्पादनात भरघोस वाढ होईल. तसेच शेतकरी बांधवांनी वेळोवेळी सोयाबीन पिकातून तण काढण्याचे काम देखील करत रहावे ज्यामुळे सोयाबीन पिकावर रोगराईचे सावट राहणार नाही.

सोयाबीनमधील तण व्यवस्थापन

खरं पाहता, सोयाबीन पेरणी केल्यानंतर पिकाबरोबर तण देखील मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी सोयाबीन पिकामध्ये तण काढले पाहिजे. कारण की, तण सोयाबीन झाडांचे पोषण शोषून घेतात आणि पतंगांना आकर्षित करतात. त्यांच्या प्रतिबंधासाठी तणनाशक पेरणीच्या वेळी शेतात टाकले जाते.

जे शेतकरी तणनाशक वापरू शकत नाहीत ते ते कीटकनाशकात विरघळवून फवारणी करू शकतात.

यावेळी पिकांमध्ये देठ माशी, तंबाखू सुरवंट आणि पाने खाणाऱ्या सुरवंटाचा प्रादुर्भावही वाढतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला शेतकरी बांधवांना देण्यात येतो.

सोयाबीनची सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतात कडुनिंब आणि गोमूत्रापासून बनवलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.

पिकाचे पोषण टिकवण्यासाठी जीवामृत तयार करून पिकाच्या मुळांमध्ये टाकावे. त्यामुळे पिकांना पोषण मिळून कीड-रोग होण्याची शक्यता खूपचं कमी होते.

पिकाची अशी काळजी घ्या

ऑगस्ट महिन्यात म्हणजे श्रावण मासात हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता असते. पण जर अतिवृष्टी झाली तर शेतात पाणी साचते, त्यामुळे झाडांची मुळे कुजायला लागतात. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.

वेळोवेळी 3 ते 4 सोयाबीन झाडे हलवून कीड किंवा सुरवंटाचा प्रादुर्भाव तपासत रहा आणि कीटक दिसताच कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या सल्ल्याने फवारणी करा.

कीटकांचा सेंद्रिय पद्धतीने बंदोबस्त करण्यासाठी, यलो स्टिकी ट्रॅप, फेरोमोन ट्रॅप किंवा लाईट ट्रॅप शेतात लावू शकता.

पिकातील कीटक-रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकभक्षी पक्ष्यांचीही मदत घेता येते. या पक्ष्यांना बसण्यासाठी शेतात “टी” आकाराचे पक्षी-पारे बसवावेत.

सोयाबीनचे पीक 25 दिवसांचे झाल्यावर शेतात निरीक्षण वाढवा आणि पिकाची गुणवत्ता राखण्यासाठी सेंद्रिय द्रावणाचा अवलंब करा.