Soybean Farming : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक असून या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. संपूर्ण भारतवर्षाचा विचार केला तर भारतात मध्य प्रदेश या राज्यात सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन (Soybean Production) घेतले जाते.

मध्यप्रदेश पाठोपाठ आपल्या महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन पाहायला मिळते. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीन पिकाची अंतिम टप्प्यात कशा पद्धतीने काळजी घ्यायची याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो महाराष्ट्रात सोयाबीन पीक अंतिम टप्प्यात आले असून आगामी काही दिवसात सोयाबीनची काढणी (Soybean Harvesting) सुरू होणार आहे.

राज्यातील काही ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी सोयाबीनची आगात (Early Soybean) म्हणजे लवकर पेरणी केली होती त्या शेतकरी बांधवांचा सोयाबीन काढणीसाठी तयार देखील झाला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन पिकाची अंतिम टप्प्यात कशी काळजी घ्यायची.

सोयाबीन दाणे भरत असताना किंवा पीक पक्वतेच्या अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ता खराब होऊ शकते किंवा सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी पिकाची काढणी करणे योग्य ठरते, त्यामुळे नुकसान टाळले जाते. सोयाबीनच्या फुटण्यामुळे होणारे नुकसान किंवा सोयाबीनच्या अंकुरामुळे बियाण्याची गुणवत्ता कमी होते.

ज्या भागात सतत पाऊस पडत आहे, कृपया तुमच्या शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करा आणि पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान होण्यापासून वाचवा.

सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींमध्ये, सोयाबीनचा रंग पिवळा झाल्यावर 90% सोयाबीन काढता येते, त्यामुळे बियाण्याच्या उगवणावर विपरित परिणाम होत नाही.

सोयाबीनचे काढणीचे पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. ताबडतोब मळणी करणे शक्य नसल्यास, पावसापासून संरक्षण करण्यासाठी पिक सुरक्षित ठिकाणी गोळा करा.

येत्या वर्षात बियाणे म्हणून उपयोगात आणल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाची मळणी 350 ते 400 आर.पी.एम. वर करा जेणेकरून बियाण्याच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होणार नाही.

मित्रांनो निश्चितच सोयाबीन आता अंतिम टप्प्यात आला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे. या गोष्टींची खातरजमा केल्यास शेतकरी बांधवांना उत्पादनात वाढ दिसून येईल. शिवाय हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला जाणार नाही.