Poultry Farming: देशात गेल्या अनेक शतकांपासून कुक्कुटपालन (Poultry Farming Business) हा व्यवसाय केला जात आहे. सुरुवातीच्या काळात गावरान किंवा देशी कोंबड्यांचे संगोपन करून शेतकरी बांधव (Farmer) शेतीसोबतच (Farming) अतिरिक्त उत्पन्न कमवण्यासाठी कुकूटपालन व्यवसाय करत होता.

मात्र या आधुनिक युगात कुकूटपालन आता व्यावसायिक स्तरावर केले जात आहे. व्यावसायिक स्तरावर ब्रॉयलर सारख्या कोंबड्यांचे संगोपन करून शेतकरी बांधव चांगली कमाई (Farmer Income) करत आहेत. मात्र असे असले तरी आजही बाजारात गावरान किंवा देशी कोंबड्यांना चांगलीच मागणी आहे.

अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी देशी कोंबड्यांच्या सुधारित जातींची (Chicken Breed) माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो खरे पाहता देशी कोंबड्यांचे संगोपन अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी अतिरिक्त उत्पन्न कमवून देण्याचे एक शाश्वत साधन बनणार आहे.

शा परिस्थितीत आज आपण हितकारी आणि स्वर्णधारा या दोन देशी कोंबड्यांच्या जातींची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया देशी कोंबड्यांच्या या दोन सुधारित जातींची माहिती.

देशी किंवा गावरान कोंबडीच्या सुधारित जाती

मित्रांनो जर आपणास देशी कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल तर आपण हितकारी आणि सुवर्णधारा या दोन देशी जातींच्या कोंबडीचे संगोपन करु शकता.

हितकारी देसी किंवा गावरान कोंबडीची एक जात:- मित्रांनो शेतकरी बांधव या गावरान किंवा देशी कोंबडीला उघड्या गळ्याची कोंबडी म्हणून ओळखत असतात. मित्रांनो यामागे कारण असे की, या कोंबडीच्या मानेच्या जागेवर पिसे नसतात यामुळे मान उघडी दिसते. इतर देशी कोंबड्यांच्या तुलनेत या कोंबड्या मोठ्या आकाराच्या आणि लांब मानेच्या असतात. या जातीचे नराची (कोंबडा) वयात आल्यानंतर मानेची उघडी त्वचा लालसर भासत असते.

या गावरान किंवा देशी कोंबड्यांचे 20 आठवड्यांत एक किलो पर्यंत वजन भरत असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो देशी कोंबड्या इतर संकरित ब्रॉयलर कोंबडी पेक्षा कमी अंडी देतात. देसी किंवा गावरान कोंबडीची ही जात वार्षिक 99 अंडी घालत असते. निश्चितच जास्त शेतकरी बांधवांना देशी कोंबड्यांचे संगोपन करायचे असेल ते शेतकरी बांधव या कोंबडीचे संगोपन करु शकतात.

स्वर्णधारा देसी किंवा गावरान कोंबडीची एक जात:- स्वर्णधारा ही देशी कोंबडीची एक जात आहे. इतर देशी जातींच्या तुलनेत या जातीची वाढ झपाट्याने होत असल्याचा दावा केला जातो. इतर देशी जातीच्या तुलनेत ही कोंबडी आकाराने लहान आणि हलक्या वजनाची असते. या देशी जातीच्या कोंबडीचे संगोपन अंडे आणि मांस अशा दोन्ही कामांसाठी केले जाते. 23 व्या आठवड्यात या जातीची मादी म्हणजे कोंबडी 3 किलो वजनाची तयार होत असल्याचा दावा जाणकार करत असतात.

या जातीचा नर किंवा कोंबडा 23 आठवड्यात सुमारे चार किलो वजनाचा बनतो. स्वर्णधारा कोंबड्या एका वर्षात अंदाजे 190 अंडी देत असल्याचा दावा केला जात आहे. निश्चितच अंड्याच्या उत्पादन करण्यासाठी या जातीची शेतकरी बांधव निवड करू शकतात.

मित्रांनो कोणत्याही जातीच्या कोंबडीचे संगोपन करण्याआधी आपल्या भागातील हवामानाचा विचार करून तसेच तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन कुकूटपालन व्यवसाय केला तर निश्चितच आपणास लाभ मिळणार आहे. इथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही, यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला आवश्यक राहणार आहे.