Paddy Farming : संपूर्ण भारतवर्षात खरीप हंगामात (Kharif Season) बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) भातशेती (Rice Farming) करत असतात. आपल्या राज्यात देखील भाताची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते.

राज्यातील कोकण किनारपट्टी भागात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागात भात शेती बघायला मिळते. मात्र भातशेतीसाठी जास्त पाणी लागते. अशा परिस्थितीत त्याच्या लागवडीमुळे जमिनीची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत मायबाप शासन देखील आता शेतकरी बांधवांना भाताची लागवड न करण्याचा सल्ला देत आहेत.

हरियाणा राज्य सरकारने तर भात शेती करू नये यासाठी शेतकरी बांधवांना अनुदान देण्याची सुरवात केली आहे. खरं पाहता पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकरी भाताचे चांगले वाण (Rice Variety) निवडू शकत नाहीत. अशा परिस्थितीत आता कमी पाणी आणि कमी वेळेत येणाऱ्या धानाच्या वाणांची (Paddy Variety) मागणी वाढत आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेता पुसा संस्थेने धानाच्या अनेक चांगल्या जाती विकसित केल्या आहेत. आज आपण पुसा संस्थेने विकसित केलेल्या धानाच्या काही प्रगत जाती जाणून घेणार आहोत.

पुसा बासमती 1718 :- धानाची ही एक सुधारित जात आहे. या जातीला पुसा संस्थेने विकसित केले आहे. जाणकार लोकांच्या मते धानाची पुसा बासमती 1718 ही जात 20 टक्के कमी पाणी वापरते. या धानाच्या प्रगत जातीपासून एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळते. ही जात 120 ते 140 दिवसांत परिपक्व होते. या जातीची रोग प्रतिकारशक्तीही चांगली असल्याचा दावा देखील केला जात आहे.

पुसा बासमती 1121:- ही देखील धानाची एक सुधारित जात आहे. ही जात देखील कमी पाण्यात चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे. पुसा बासमती 1121 जातीचे धान पीक 20 टक्क्यांहून अधिक पाण्याची बचत करते. धानाची ही जात 135 दिवसांत परिपक्व होते. यापासून एकरी 25-30 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला गेला आहे.

पुसा बासमती 1509:- पुसा बासमती 1509 ही देखील धानाची एक प्रगत जात आहे. ही जात कमी वेळेत आणि कमी पाण्यात जास्त उत्पादनासाठी ओळखली जाते. ही जात 110 ते 115 दिवसांत परिपक्व होऊन काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा केला जात आहे. या जातीपासून एकरी 20 ते 25 क्विंटल धानाचे उत्पादन मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

पुसा बासमती 1637:- पुसाने विकसित केलेली ही देखील एक सुधारित जात आहे. पुसा बासमती 1637 जात कमी पाण्यात जास्त उत्पादनासाठी ओळखली जाते. या जातीला परदेशातही मोठी मागणी आहे. जाणकार लोकांच्या मते, ही जात 140 दिवसांत परिपक्व होते. या जातीपासून एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जात आहे.