MHLive24 टीम, 22 सप्टेंबर 2021 :-  शेतकऱ्यांच्या या चालाकीमुळे साठवूण करुन ठेवलेल्या कांद्याला योग्य दर मिळालेला आहे. पावसामुळे यंदा दक्षिणेकडील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमधून नवीन लाल कांदा उशिराने बाजारात दाखल होणार आहे.(Onion prices news)

त्यामुळे मागणी आणि पुरवठा यातील तफावत लक्षात घेता शेतकऱ्यांनी साठवूण ठेवलेला उन्हाळ कांदा बाजारात आणला आहे. या कांद्याला एक दिवसाच्या फरकाने चक्क क्विंटलमागे 230 रुपये वाढवून मिळाले आहेत.

कांद्यासाठी नाशिकची बाजारपेठ ही प्रसिध्द आहे. राज्यातूनच नव्हे तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतूनही कांद्याची आवक होत असते. यंदा मात्र पावसामुळे सर्वच शेतीमालाचे गणित बिघडले आहे.

आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून लाल कांद्याची आवक ही आतापर्यंत सुरु झालेली असते. यंदा मात्र, पावसामुळे हा लाल कांदा बाजारात अद्यापही दाखल झालेला नाही.

त्यामुळे पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढलेली आहे. ही तफावत लक्षात घेता आता राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे.

मागणी जास्त असल्याने एकाच दिवसाच्या फरकाने शेतकऱ्यांना 230 रुपये अधिकचे मिळाले आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला 2120 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. 29 जुलै रोजी उन्हाळ कांदा 2020 होता त्यानंतर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाली.

आज पावणे दोन महिन्यानंतर पुन्हा उन्हाळ कांदा लासलगाव बाजर समिती दोन हजार रुपये पार झाला आहे. आज लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती 911 वाहनातून 14 हजार 076 क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली होती. त्याला कमाल 2,120 रुपये ,किमान 800 रुपये तर सर्वसाधारण 1,980 रुपये इतका प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup