Onion Farming : भारतात कांदा लागवड (Onion Cultivation) जवळपास सर्वत्र केली जाते. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात (Onion Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांद्याची (Rabi Onion) लागवड केली जाते. खरीप हंगामातील कांद्याची शेती केली जाते मात्र रब्बी हंगामात कांदा लागवड खरीप हंगामापेक्षा (Kharif Season) अधिक आहे.

मित्रांनो रब्बी हंगामात (Rabi Season) कांदा लागवड करण्यासाठी शेतकरी बांधव ऑक्टोबर महिन्यात कांद्याची रोप वाटिका तयार करत असतात. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत.

येत्या काही दिवसात शेतकरी बांधव रब्बी हंगामातील कांदा लागवड करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बांधव या महिन्यात रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी रोपवाटिका देखील तयार करणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना रब्बी हंगामात कोणत्या जातींची (onion variety) लागवड केली पाहिजे याविषयी आज आपण बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. 

रब्बी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे :-

भीमा शक्ती :- भीमा शक्ती ही कांद्याची एक सुधारित जात असून या जातीची रब्बी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे. मित्रांनो या जातीची शेती संपूर्ण भारतवर्षात केली जाते असं म्हटलं तरी काही वावगे ठरणार नाही. कारण की या जातीची शेती भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाना, बिहार, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओरिसा इत्यादी राज्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.

या जातीच्या कांद्याचा रंग हा लाल असतो. जाणकार लोकांच्या मते या जातीचा कांदा लागवड केल्यानंतर जवळ पास 130 दिवसांत काढणीस साठी तयार होतं असतो. ही जात हेक्‍टरी 30 टन उत्पादन देण्यास सक्षम असते. जाणकार लोकांनी दावा केला आहे की या जातीच्या कांदा हा सहा महिने टिकू शकतो. म्हणजे या कांद्याचे सहा महिने साठवणूक केली जाऊ शकते.

भीमा रेड :- कांद्याच्या या जातीची रब्बी हंगामात आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीची मुख्यता मध्यप्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रा साठी शिफारस करण्यात आली आहे.

या जातीच्या रोपांची लागवड केल्यानंतर 110 ते 120 दिवसानंतर उत्पादन मिळण्यास सुरवात होते. या जातीपासून हेक्‍टरी 30 टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जातीची साठवणक्षमता मात्र तीन महिने कालावधी पर्यंतच आहे.