Onion Farming : भारतात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड (Onion Cultivation) केली जाते. कांद्याचे क्षेत्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यात कांद्याची लागवड महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

खरं पाहता कांद्याची लागवड (Farming) खरीप हंगामात, रब्बी हंगामात तसेच उन्हाळी हंगामात केली जाते. खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीसाठी राज्यात सध्या शेतकरी बांधव (Farmer) लगबग करत असल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी आपल्याकडे रब्बी आणि उन्हाळी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते.

रब्बी हंगामातील (Rabbi Season) कांद्याची लागवड शेतकऱ्यांमध्ये चांगली आणि विश्वासार्ह मानली जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण खरीप रब्बी आणि उन्हाळी हंगामात लावल्या जाणाऱ्या कांद्याच्या काही सुधारित जातींची (Onion Variety) माहिती जाणून घेणार आहोत.

भारतवर्षात उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याच्या काही सुधारित जाती 

भीमा सुपर:- मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, लाल कांद्याची ही जात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये लावण्यासाठी योग्य आहे. या जातीची लागवड खरीप हंगामात पसात केली जाते.

खरिपात उशिरा कांद्याची लागवड करायचे असल्यास कांद्याची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.  ही जात खरिपात 22 टन प्रति हेक्टर आणि खरीपात पसात लागवड केल्यास 40 ते 45 टन प्रति हेक्टर उत्पादन देते. याशिवाय खरीपात 100 ते 105 दिवसांत आणि लेट खरिपात 110 ते 120 दिवसांत कांदे उत्पादन देण्यास तयार होतं असतात.

भीमा गडद लाल:- ही जात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लावली जाणारी जात आहे. या जातीची सरासरी 20 ते 22 टन प्रति हेक्टर उत्पादन देण्याची क्षमता आहे. या जातीचे आकर्षक गडद लाल रंगाचे सपाट आणि गोलाकार कांदे असतात. जाणकार लोकांच्या मते भीमा गडद लाल जातीचे कांद्याचे पीक सुमारे 95 ते 100 दिवसांत तयार होतात.

भीमा लाल:- या जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याशिवाय दिल्ली, गुजरात, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये खरीप हंगामात या जातीची लागवड केली जात आहे. या पिकाची पेरणी खरीप हंगामाच्या शेवटीही करता येते.

हे पीक खरिपात 105 ते 110 दिवसात आणि लेट खरीप आणि रब्बी हंगामात 110 ते 120 दिवसात परिपक्व होते. ते खरिपात सरासरी 19 ते 21 टन प्रति हेक्टर उत्पादन देऊ शकते. यासोबतच लेट खरीप हंगामात 48 ते 52 टन प्रति हेक्टर आणि रब्बी हंगामात 30 ते 32 टन प्रति हेक्टर उत्पादन देऊ शकते. या जातीच्या कांद्याची रब्बीमध्ये लागवड केल्यास उत्पादीत केलेले कांदे सुमारे 3 महिने साठवले जाऊ शकतात.