Mustard Farming : भारतात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मोहरी (Mustard Crop) हे देखील असंच एक प्रमुख तेलबिया पीक आहे. याची लागवड भारतातील अनेक राज्यात केली जाते.  आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील मोहरी एक महत्त्वाचे तेलबिया पीक मानले जाते.

या पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते. जाणकार लोक शेतकरी बांधवांना (Farmer) मोहरी पिकाच्या शेतीतून (Farming) चांगले दर्जेदार उत्पादन (Farmer Income) मिळण्यासाठी सुधारित जातींची (Mustard Variety) पेरणी करण्याचा सल्ला देतात.

शेतकरी बांधव देखील मोहरी पिकातून अधिक उत्पादन मिळविण्यासाठी, भरपूर उच्च उत्पादन देणार्‍या जातीची पेरणी करत असतात. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी मोहरीच्या एका सुधारित जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो HAU ने RH 725 ही मोहरीची नवीन जात विकसित केली आहे. या जातीपासून जास्त उत्पादन घेता येते, त्यामुळे ही जात शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया या मोहरीच्या सुधारित जाती बद्दल काही महत्त्वाची माहिती.

RH 725 व्हरायटीची वैशिष्ट्ये:-

मोहरीच्या RH 725 जातीची विशेषता खालीलप्रमाणे 

जाणकार लोकांच्या मते, मोहरीची ही एक सुधारित जात अडून 136 ते 143 दिवसांत ती काढणीसाठी तयार होतं असते.

या जातीच्या शेंगा लांब असतात आणि दाण्यांची संख्या 17-18 पर्यंत असते आणि दाण्यांचा आकार जाड असतो.

यांशिवाय याच्या शेंगा असलेल्या फांद्या लांब असतात आणि त्यामध्ये फुटवा देखील अधिक असतो.

धुके आणि थंडीच्या ठिकाणी मोहरीची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी आहे. 

गव्हासह मोहरीचे चांगले पीक घेण्यासाठी ही जात उपयुक्त आहे. मोहरीचे हे वाण शेतकरी खूप पसंत करत आहेत.

बियाण्याचे प्रमाण:- जर शेतकरी बांधवांना या जातीच्या मोहरीची लागवड करायची असेल तर शेतकऱ्यांना प्रति एकर 1 किलो बियाणे लागेल.

या जातीसाठी आवश्यक पाणी व्यवस्थापन:- मोहरीच्या या जातीला सुमारे 2 सिंचनाची आवश्यकता असते.

या जातीपासून किती मिळणार उत्पादन- RH 725 जातीचे उत्पादन 25 ते 27 क्विंटल प्रति हेक्टर पर्यंत असते.