Mushroom Farming : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपला भारत देश आपल्या संस्कृतीसाठी संपूर्ण जगात विख्यात आहे. आपल्या देशात गेल्या कित्येक शतकांपासून औषधी वनस्पतीचा (Medicinal Crops) उपयोग केला जात आहे.

आपल्या देशात औषधी वनस्पतीचा वाढता वापर लक्षात घेता औषधी वनस्पतींची शेती (Medicinal Crop Farming) देखील आता झपाट्याने वाढत आहे. मित्रांनो औषधी वनस्पती कोणत्याही रोगात प्रभावी ठरत असल्याने याच्या किमती देखील खूपच अधिक असतात. हिमाचल प्रदेशमध्ये असंच एक महागडे औषधी मशरूमची (Mushroom Crop) शेती केली जात आहे ज्याला किलोला तब्बल 60 लाख रुपयांचा भाव मिळत आहे. त्यामुळे सध्या या मशरूमची चांगलीच चर्चा रंगली आहे.

मित्रांनो आम्ही ज्या औषधी मशरूमच्या जातीबद्दल (Mushroom Variety) बोलत आहोत त्याला कॉर्डीसेप्स मशरूम म्हणून ओळखले जाते, जे की सोन्यापेक्षा महाग विकले जाते. या मशरूमला वाळवले जाते आणि परदेशी बाजारपेठेत सुमारे 60 लाख प्रति किलो या दराने विकले जाते. निश्चितच हे गुणकारी मशरूम शेतकऱ्यांना (Farmer) करोडपती बनवण्याचे साधन सिद्ध होत आहे.

कॉर्डीसेप्स मशरूम एवढे महाग का आहेत बर 

हिमालयाच्या मैदानात उगवणारा हा मशरूम सुरवंट सारख्या कीटकांच्या अवशेषांपासून वाढतो, त्यामुळे त्याला कीटक मशरूम म्हणतात. चीन आणि तिबेटमध्ये यारसागुंबा मशरूम म्हणून याला ओळखले जाते.

खरं पाहता हे एक जंगली मशरूम आहे. मात्र त्यात औषधी गुणधर्म तसेच सामर्थ्य वाढवणारे गुणधर्म आहेत, जे कर्करोग, किडनीचे आजार आणि श्वसन रोग यांसारख्या आजारांमध्ये जीवन वाचवण्याचे काम करतात.

जगभरातील अनेक खेळाडू आणि कुस्तीपटू कॉर्डीसेप्स मशरूम खाऊन आरोग्य अबाधित राखतात. त्याच्या सेवनामुळे शरीरावर इंग्रजी औषधांचा आणि रसायनांचा कोणताही चुकीचा परिणाम होत नाही.

कॉर्डीसेप्स मशरूम कुठे मिळतात 

नमूद केल्याप्रमाणे, कॉर्डीसेप्स सायनेन्सिस किंवा यार्सागुम्बा हे मशरूम हिमालयातील दुर्गम भागात आणि जंगलांमधून शोधले जातात. 3500 मीटर उंचीवर डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांना या प्रजातींची माहिती आहे. विशेषत: उत्तराखंड, लडाख आणि चीन, नेपाळ आणि भूतानला लागून असलेल्या हिमालयीन प्रदेशात, मे-जुलै दरम्यान बर्फ वितळताना त्यांचे उत्पादन सुरू होते.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हे मशरूम केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच महत्वाचे आहे असं नाही तर डोंगरावरील लोकांसाठी हे एक उत्पन्नाचे प्रमुख साधनही आहे. महागाईमुळे याची विक्री करणेही सोपे नाही. अनेकदा हिमालयीन भागातील लोक त्याची तस्करी करताना पकडले जातात.

10×10 च्या खोलीत कॉर्डीसेप्स मशरूमची शेती करता येते 

अनेक वेळा शेतीचे आधुनिक तंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. आता 10*10 च्या खोलीत लाखो किमतीच्या कॉर्डीसेप्स मशरूमची लागवडही करता येते. यासाठी संबंधित कृषी तज्ज्ञ किंवा मशरूम तज्ज्ञांशी संपर्क साधून खोलीचे आधुनिक प्रयोगशाळेत रूपांतर करू शकता.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कॉर्डीसेप्स मशरूम मशरूमच्या लागवडीसाठी प्रयोगशाळेत हिमालयाच्या खोऱ्यांसारखे वातावरण तयार केले जाते. या कामासाठी मूलभूत उपकरणे आवश्यक असून, त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

त्यानंतर युनिटची स्थापना केल्यानंतर 3 महिन्यांत पहिले 5 किलो कॉर्डीसेप्स मशरूमचे पीक तयार होते, ज्यासाठी सुमारे 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो.

अशाप्रकारे कॉर्डीसेप्स मशरूमचे पीक वर्षातून 4 वेळा लावावे लागते, यातून 12 महिन्यात सुमारे 60 लाखांचे उत्पन्न मिळते.

अनेक शेतकऱ्यांना मिळाले यश…!

कॉर्डीसेप्स मशरूमची शेती हा काही नवीन प्रकार नाही. भारतातील अनेक शेतकऱ्यांनी त्याच्या लागवडीत आपले हात आजमावले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेहराडूनच्या दिव्या रावतनेही कॉर्डीसेप्स मशरूम वाढवून खूप नाव कमावले आहे. आता संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर, डेहराडूनची दिव्या शेतकऱ्यांना याच्या शेतीसाठी प्रशिक्षण देत आहे.

एवढेच नाही तर हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आझाद नगर येथील युवा शेतकरी प्रवीण यांनीही लॅबमध्ये कॉर्डीसेप्स मशरूमची यशस्वी लागवड करून खूप नाव आणि पैसा कमावला आहे. मशरूम उत्पादक प्रवीण यांनी कॉर्डीसेप्स मशरूम फार्मिंगसाठी 5 लाख खर्चून लॅब तयार केली आणि 55 ते 60 लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळवले आहे.