Mumbai Nagpur Expressway : शिवसेना सुप्रीमो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. समृद्धी महामार्ग यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) अडचणीत सापडले आहेत.

मित्रांनो समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) म्हणजेच (Mumbai) मुंबई-नागपूर (Nagpur) एक्सप्रेसवे खरं पाहता महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्वाची भूमिका अदा करणार असल्याचे जाणकार लोकांचे म्हणणे आहे.

मात्र या महामार्गामुळे ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, शहापूर तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांची (Maharashtra News) शेतजमीन महामार्गासाठी गेली आहे असे शेतकरी बांधव अडचणीत सापडले आहेत. मित्रांनो या तालुक्यातील महामार्गासाठी आवश्यक जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अधिग्रहित केली तसेच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देखील दिला आहे.

मात्र या तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी महामार्गामुळे दोन भागात विभागल्या गेल्या आहेत. समृद्धी महामार्गासाठी आवश्यक जमिनी रस्ते महामंडळाने अधिग्रहित करून ताब्यात घेतल्यानंतर आणि शेतकऱ्यांना मोबदला दिल्यानंतर उर्वरित जमिनी आम्ही अधिग्रहित करणार नाही आणि त्या जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

हामंडळाची ही भूमिका शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील कल्याण भिवंडी शहापूर तालुक्यात शासनाच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्ट समृद्धी महामार्गामुळे 20 गुंठ्याहुन कमी जमिनीचे तुकडे झालेले एकूण 235 शेतकरी आहेत. महामार्गासाठी आवश्यक जमीन महामंडळाने अधिग्रहीत करून घेतली मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे झाले आता जमिनीच्या तुया कड्यांचे आम्ही करायचे काय असा प्रश्न घरी उपस्थित करत आहेत. महामार्गासाठी आवश्यक जमिनी महामंडळाने आपल्या ताब्यात घेऊन त्यांचा मोबदला शेतकर्‍यांना दिला.

मात्र लगतच्या जमिनी महामंडळासाठी उपयोगाच्या नसल्याने मंडळाने त्याचा ताबा संबंधित शेतकऱ्यांकडेचं ठेवला. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची कमी शेतजमीन आहे त्यांच्याकडे जमिनीचा एक टिचभर तुकडा शिल्लक राहिला आहे. आता या जमिनीत शेती करायची तरी कशी, अन एवढ्या एवढ्या तुकड्याचे करायचे काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत या जमिनी देखील शासनाने अधिग्रहीत करून घ्याव्यात आणि शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

दरम्यान महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, भिवंडी ते नागपूर समृद्धी महामार्गामुळे जमिनीचे तुकडे झालेत असे एकूण अठराशे शेतकरी आहेत. जर महामंडळाने या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर अतिरिक्त चौदाशे कोटीचा बोजा महामंडळावर येणार आहे. आणि ज्या जमिनीच्या तुकड्याचे महामंडळाला देखील काही उपयोग करता येणार नाहीये त्यामुळे महामंडळाने लगतच्या जमिनीचे तुकडे अधिग्रहित करण्यास नकार दिला आहे.

मित्रांनो दशके आपणास ठाऊक कसा आहे महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा अमलात आणला गेला आहे. या कायद्यान्वये शेतकरी बांधवांना 20 गुंठे पेक्षा कमी शेत जमिनीचा तुकडा खरेदी विक्री करता येत नाही. शिवाय हा तुकडा महामार्गालगत आला असल्याने तेथे जाण्यासाठी पोहोच रस्ता देखील नाही. यामुळे त्या ठिकाणी शेती करणे अशक्य आहे शिवाय महामार्गालगत जमिनी असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम देखील करता येऊ शकणार नाही.

अशा परिस्थितीत या एवढ्या एवढ्या तुकड्याचे करायचे काय? एकंदरीत 20 गुंठे पेक्षा कमी शेतजमीन असल्यामुळे खरेदीखत बनत नाही. यामुळे या जमिनी कोणी खरेदी करणार नाही. शिवाय त्या ठिकाणी शेती करता येणार नसल्याने शेतकरी बांधवांना या जमिनी मोकळ्या सोडण्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या तुकड्यांचे अधिग्रहण शासनाने करावे अशी मागणी केली आहे.