Monsoon Update : दुसऱ्या चरणातील मान्सूनने (Monsoon) आपल्या महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. गत महिन्यात राज्यात सर्वत्र अति मुसळधार पाऊस (Monsoon News) बघायला मिळाला होता. विदर्भात तर पावसाचे (Rain) थैमान बघायला मिळाले होते.

विदर्भात गत महिन्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विदर्भ वासियांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. शिवाय विदर्भातील अनेक शेतकरी बांधवांचे (Farmer) यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिके पूर्णतः वाया गेले आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी पावसाचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात अजूनही मान्सून सक्रिय आहे. अशा स्थितीत शुक्रवारी देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. यामुळे राज्यात पावसाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. आज शुक्रवारी राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान केंद्र मुंबईने (Mumbai Weather Department) जारी केला असल्याने काही ठिकाणी शेतकरी बांधवांना याचा फायदा होणार आहे तर काही ठिकाणी यामुळे नुकसान देखील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

हवामान केंद्र मुंबईने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यातील इतर भागात देखील पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने उद्या देखील राज्यात पावसाची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. शनिवारी राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.  उद्या या जिल्ह्यांव्यतिरिक्त हिंगोली आणि नांदेडमध्येही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाची लक्षात घेता हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की महाराष्ट्रात मान्सून सुरू झाल्यानंतर, पावसाळा सतत सुरू आहे.

प्रमुख शहरातील मान्सून अंदाज 

हवामान केंद्र मुंबईने राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात हलक्या पावसाचा अंदाज आहे. नागपूर शहरात देखील पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक मध्ये देखील हलका पाऊस बरसणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे.