Monsoon update

Monsoon Update: महाराष्ट्रात (Maharashtra Weather Update) गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या (Monsoon) दुसऱ्या चरणातील पाऊस (Rain) धुमाकूळ घालत असल्याचे चित्र आहे. मुसळधार पाऊस (Rain Alert) हा थांबण्याच काही नाव घेत नाही.

काल देखील महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने (Monsoon news) हजेरी लावली. आज देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. आज राज्यातील विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.

या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन हवामान केंद्र मुंबईने पुन्हा एकदा विदर्भातील या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आज 19 ऑगस्ट रोजी या जिल्ह्यांव्यतिरिक्त मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी येथेही पावसाची शक्यता लक्षात घेता यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने वर्तवला सुधारित अंदाजानुसार, 20 ऑगस्ट रोजी राज्यातील विदर्भात तसेच मराठवाडा आणि कोकणातील दक्षिण भागात दमदार पावसाची शक्यता आहे. 20 ऑगस्ट रोजी अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी देखील भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो काल बुधवारी देखील महाराष्ट्रात पाऊस सुरूच होता. संततधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांवर देखील विपरीत परिणाम बघायला मिळत आहे.

राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत यामुळे राज्यातील अनेक धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावकर्‍यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीपात्रात धरणाच्या पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठी असलेल्या शेतीपिकांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत.