Monsoon Update : दुसऱ्या चरणातील मान्सूनने जुलै महिन्यात महाराष्ट्रात अक्षरशा थैमान माजवलं होतं. महाराष्ट्रातील (Maharashtra Weather Update) विदर्भात पावसाचे (Rain) विक्राळ रूप जुलैमध्ये बघायला मिळाले.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात देखील राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) झाला. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. एवढेच नाही खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात त्यामुळे नासाडी देखील झाली.

मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात पावसाने (Monsoon) चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात विशेषतः मराठवाड्यात पिके करपण्याची वेळ आल्याचे दृश्य आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी बांधव पावसाची (Monsoon News) अजूनही आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान भारतीय हवामान विभागाचा (IMD) मराठवाड्यासाठी एक दिलासादायक अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. एवढेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आज पावसाची शक्‍यता आहे. या संबंधीत जिल्हयांना भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज मुंबई आणि ठाण्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार 1 सप्टेंबर पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे ज्या भागात पावसाची गरज आहे अशा भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, यावर्षी आत्तापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची राज्यात नोंद झाली आहे. यामुळे भविष्यात विशेषता उन्हाळी हंगामात पावसाची कमतरता भासणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

राज्यातील तमाम नदी आणि धरणाच्या जलाशयात मोठा साठा आता निर्माण झाला आहे. मित्रांनो खरे पाहता मान्सून सुरू होण्याच्या पहिल्या काही दिवसात राज्यात सर्वत्र पावसाने दांडी मारली होती. मात्र मध्यंतरी विशेषता जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ माजवला होता.

त्यामुळे यावर्षी लवकरच सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे विदर्भात कोकणात तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले होते. या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे राज्यातील या संबंधित भागात खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली होती. मात्र आता शेतकरी बांधव अतिवृष्टी सारख्या पावसापासून वाचलेली पीके जोपासण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे.