Monsoon Update: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने (Monsoon) उघडीप दिली असली तरी देखील घाटमाथ्यावर पावसाच्या (Monsoon News) सरी बरसत आहेत. आज देखील भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Weather Update) राज्यात पावसाची शक्यता आहे.

राज्यातील विदर्भात विषेषता पूर्व विदर्भात पावसाची (Rain) शक्यता असून भारतीय हवामान विभागाने पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मध्ये बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली विकसित झाल्यामुळे विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

विदर्भ बरोबरच राज्यातील कोकण किनारपट्टीत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देशील पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे. दरम्यान जुलै महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यातील पहिला दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठी चांगलीच मशक्कत करावी लागत आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळत असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. उर्वरित राज्यात मात्र पावसाने उघडीप दिली आहे.

असे असले तरी आज पासून पूर्व विदर्भात पावसाची दाट शक्यता असून मराठवाड्यात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे. एकंदरीत आज पूर्व विदर्भात मराठवाड्यात घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच राज्यातील कोकणात तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्‍यता असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. निश्चितच तूर्तास तरी पावसाची उघडीप संपूर्ण राज्यात बघायला मिळत नाहीये.

दरम्यान राज्यातील अनेक धरणे शंभर टक्के क्षमतेने भरली असल्याने राज्यातील काही प्रमुख धरणाचा पाण्याचा विसर्ग देखील सुरू झाला आहे. धरण साठ्यातून पाणी नदीपात्रात सोडले जात असल्याने नदीकाठी वसलेल्या गावात सतर्कतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून दिला जात आहे तसेच यामुळे नदीकाठी वसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना देखील मोठी हानी पोहोचत आहे.