Monsoon Update : महाराष्ट्रातून मान्सूनच्या (Monsoon) परतीच्या पावसाबाबत हवामान खात्याने (IMD) नवे अपडेट दिले आहे. हवामान खात्याच्या मुंबई कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा महाराष्ट्रातून 15 दिवस अगोदर मान्सून (Monsoon News) परतायला सुरुवात करेल.

यामुळे यावर्षी पावसाची (Rain) कमतरता जाणवणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते या वर्षी मान्सून (Rain) लवकरच परतणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा (Maharashtra Monsoon) परतीचा प्रवास सुरु होणारं आहे.

खरे पाहता दर वर्षी मान्सून 17 सप्टेंबर पासून परतीच्या मार्गावर जात असतो मात्र यावर्षी मान्सून (Maharashtra Rain) लवकरच परतीच्या मार्गावर जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात गणेशोत्सवादरम्यान पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक भागात गावांचा उर्वरित भागांशी संपर्क तुटला होता. शेती उद्ध्वस्त झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करण्यात आली.

आता हा मान्सून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात परतण्याची तयारी करत आहे. साधारणपणे 15 ते 17 सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनची माघार सुरू होते आणि 30 सप्टेंबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून परततो. मात्र यावेळी महाराष्ट्रातून मान्सूनची माघार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टिकेल की नाही अशी संभ्रम अवस्था शेतकऱ्यांच्या मनात आहे. मात्र यावर्षी वर्षभर पाणीपुरवठ्याची अडचण भासरणार नसल्याचे तज्ञांचे मत आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी उन्हाळ्यात पाण्याचे संकट येणार नाही.

यावेळी मान्सून लवकर परतेल पण तो मुबलक पाणी देऊन जाईल. दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाची उघडीप बघायला मिळत आहे. यामुळे मराठवाड्यातील पिकांना मोठा फटका बसत आहे. विदर्भात अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होत आहे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात कमी पावसामुळे पिकांची नासाडी ही ठरलेलीच आहे.

अशा परिस्थितीत यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. मात्र असे असले तरी या वर्षी अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याने आगामी दिवसात शेतीसाठी याचा फायदा होणार असून उन्हाळी हंगामात देखील पिके आता जोमाने वाढणार आहेत.