Medicinal Plant Farming

Medicinal Plant Farming: मित्रांनो देशात अलीकडे औषधी वनस्पतींची (Medicinal Crop) शेती (farming) मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेष म्हणजे औषधी वनस्पतींची शेती शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहे. कमी खर्चात उत्पादन देण्यास तयार होणाऱ्या औषधी पिकांच्या शेतीतून शेतकरी बांधवांना लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) होत आहे.

जाणकार लोकांच्या मते औषधी पिकाच्या लागवडीत शेतकरी बांधवांना (Farmer) कमी प्रमाणात मेहनत घ्यावी लागते. अशा परिस्थितीत औषधी वनस्पतींच्या शेती शेतकरी बांधवांना अत्यल्प खर्च आणि मेहनत खूपच कमी लागते. यामुळे आज आपण देखील एका विशेष औषधी वनस्पतीच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आज आपण स्वीट फ्लॅग या औषधी वनस्पतीच्या शेती विषयी (Sweet Flag Farming) जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वीट फ्लॅग याला आपण वेखंड म्हणून संबोधत असतो. या औषधी वनस्पतीची (Sweet Flag Crop) विशेषता योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील बोलून दाखवली आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

वेखंड काय आहे बरं…!

योग गुरु रामदेव बाबा यांच्या मते, औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेखंड वनस्पती अनेक गंभीर आजारांवर उपचार करणारी आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, अनेक कंपन्या शेतकऱ्यांना ठेके देऊन त्याची व्यावसायिक लागवड करून घेतात. श्‍वसनाचे आजार, अपचन, लघवीचे आजार, जुलाब आणि पोटाशी संबंधित समस्यांवर याच्या राईझोमचे तेल संजीवनीसारखे काम करते. अशा परिस्थितीत या पिकाची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे.

वेखंड लागवडीसाठी हवामान कसं लागत बरं…!

वेखंड वनस्पती मुख्यतः मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहारच्या दलदलीच्या भागात आढळते. याशिवाय सातपुडा आणि नर्मदा नदीच्या काठावर ही औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आढळत आहे. सध्या त्याची औषधी लागवड हिमालय, मणिपूर आणि नागा हिल्सच्या तलावांमध्ये केली जात आहे. गाळाची जमीन, गुळगुळीत आणि वालुकामय माती असलेली जमीन याच्या लागवडीस उत्तम असल्याचे सांगितले जात आहे.

अशा पद्धतीने वेखंड लागवड करा…!

वेखंड म्हणजेच स्वीट फ्लॅग या औषधी वनस्पतीच्या लागवडीसाठी चांगले पाणी असलेली बागायती जमीन निवडावी. तसेच 10 ते 38 अंश तापमानात सिंचनाची चांगली व्यवस्था असावी.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, त्याची रोपे खूप उष्ण तापमानात वाढू शकत नाहीत, म्हणून कमी थंडीत सामान्य तापमानातही त्याची लागवड करणे फायदेशीर आहे.

वेखंड पेरणीसाठी अंकुरलेले बियाणे आणि rhizomes वापरले जातात, जे जुन्या पिकातूनच मिळते.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रोपवाटिकेत रोपे तयार करू शकता आणि पावसाळ्यात त्याचे पुनर्रोपण करण्याचे काम करू शकता.

पेरणी किंवा लावणीनंतर पहिले पीक साधारण 8 ते 9 महिन्यांत तयार होते.

जेव्हा झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात, तेव्हाच झाडे मुळासह उपटतात.

मातीतून काढलेले rhizomes पुन्हा लागवडीसाठी किंवा औषधी तेल काढण्यासाठी वापरले जातात.

सुपीक जमिनीत या औषधी पिकांची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो.

कमी बागायत किंवा कोरडवाहू क्षेत्रात चांगल्या उत्पादनासाठी, दर 10 ते 12 दिवसांनी चांगले सिंचन केले पाहिजे.

वेखंड शेतीतून मिळणार उत्पन्न…! 

वेखंड औषधी वनस्पतीची शेती ही काहीशी भातासारखीच आहे, ज्याच्या लागवडीमध्ये सर्वाधिक खर्च पोषण व्यवस्थापन आणि पाण्यावर होतो. वेखंड औषधी वनस्पतीच्या शेतीसाठी, प्रति एकर जमिनीवर 1 लाख रोपे लावली जाऊ शकतात, ज्यासाठी फक्त 40,000 रुपये खर्च अपेक्षित आहे.

दुसरीकडे त्याच्या बाजारपेठेबद्दल बोलायचे तर, दिल्ली, बंगळुरू, हरिद्वार, टनकपूर आणि नीमचसह अनेक मंडईंमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि विक्री केली जाते. चाळीस हजार रुपये खर्च करून एक एकर जमिनीतुन 2 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, त्यापैकी शेतकऱ्याला सुमारे 1.5 लाख निव्वळ नफा मिळतो. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी पाच एकरात या पिकाची शेती केली तर त्यांना दहा लाखांची कमाई होणार आहे.