Medicinal Plant Farming : भारतात गेल्या अनेक दशकांपासून औषधी वनस्पतींची (Medicinal Crops) शेती (Farming) केली जात आहे. ढासळती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे जगभरात वेगवेगळ्या आजारांचे सावट बघायला मिळत आहे. अशा परिस्थितीत औषधी वनस्पतींची खपत देखील मोठी वाढली आहे.

मधुमेह हा देखील एक गंभीर आजार असून या आजाराच्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधी वनस्पतींचा खप दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. जर शेतकऱ्यांची (Farmer) इच्छा असेल तर ते देखील मधुमेह आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी हातभार लावू शकतात.

मित्रांनो आता तुम्ही म्हणत असाल हे कसं शक्य आहे तर आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मधुमेह आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्टीविया (Stevia Crop) या औषधी वनस्पतीची मोठी मागणी आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव स्टिव्हिया शेती (Stevia Farming) करून या आजारावर नियंत्रण मिळवण्यास मदत करू शकणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) देखील दुपटीने वाढणार आहे. 

जाणकार लोकांच्या मते, स्टीव्हियाच्या वाळलेल्या पानांचा वापर साखरेच्या रुग्णांसाठी बेकरी उत्पादने, शीतपेये आणि मिठाई बनवण्यासाठी केला जातो. यापासून तयार करण्यात आलेले उत्पादन डायबिटीज असलेल्या रूग्णांसाठी त्याही परिस्थितीत घातक नसतात. स्टीविया या औषधी वनस्पतीला मधुपत्र, मधुपर्णी, हनी प्लांट किंवा मिठी तुळशी असेही म्हणतात.

या वनस्पतीची वाळलेली पाने बाजारात 250 ते 500 रुपये प्रति किलो दराने विकली जाते. शेतकर्‍यांना हवे असल्यास ते स्टीव्हिया या औषधी वनस्पतीची शेती करून लागवड केल्यापासून पुढील 5 वर्षांसाठी ऊस शेतीच्या तुलनेत 40 पट अधिक नफा मिळवू शकतात. निश्चितच स्टीविया या औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणारी ठरणार आहे.

कमी खर्चात बंपर नफा मिळणार…!

स्टीव्हियाचे मोठे वैशिष्ट्य म्हणजे मधुमेहासाठी ही औषधी वनस्पती गुणकारी आहे. शिवाय या औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांसाठी हिरव्या सोन्यासारखी काम करते. पिकावर कीड व रोग येण्याची शक्यता नसल्याने कीटकनाशकांचा खर्च वाचतो. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव केवळ सेंद्रिय पद्धतीने स्टीव्हिया लागवड करू शकतात. जाणकार लोक सांगतात की याची लागवड करून शेतकरी बांधव एकरी 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवू शकतात.

स्टीव्हियाची लागवड कशी केली जाते बर…!

सामान्य तापमानात स्टीव्हियाची लागवड करणे फायदेशीर ठरते. भारतात सप्टेंबर ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत लागवड करावी.

त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी, 20 ते 25 टन कुजलेले शेण किंवा 7-8 टन प्रति एकर गांडूळ खत शेतात टाकले जाते.

याआधी, स्टीव्हियाच्या सुधारित जातींचे बियाणे लावून रोपे तयार केली जातात, ज्यातून कळ्या बाहेर आल्यावर ते शेतात लावले जातात.

स्टीव्हिया रोपांच्या पुनर्लागवडीसाठी बेडची उंची 2 फूट आणि रुंदी 15 सेमी असावी.

लावणीच्या वेळीही प्रत्येक रोपामध्ये सुमारे 20 ते 25 सें.मी.  अंतर ठेवले पाहिजे, म्हणजे तण काढण्याचे काम करता अगदी सहज करता येईल.

हिवाळ्यात स्टीव्हियाच्या झाडांना दर 10 दिवसांनी सिंचन दिले जाते, तर उन्हाळ्यात दर आठवड्याला सिंचनाची गरज असते.

स्टीव्हिया पीक व्यवस्थापन कसं करणार बर..!

जरी स्टेव्हिया पीक पूर्णपणे कीडमुक्त असले, तरी देखील बर्याचदा या औषधी पिकामध्ये तण वाढते. अशा परिस्थितीत तर नियंत्रण करणे अति महत्त्वाचे ठरते. तण नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांना वारंवार निंदणी तसेच खुरपणी करण्याचा सल्ला दिला जातो.

या पिकात बोरॉन घटकाच्या कमतरतेमुळे पानांवर ठिपके दिसू लागतात, याच्या प्रतिबंधासाठी एकरी 6% बोरॅक्स फवारणी करावी.

स्टीव्हियाचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी, त्याची फुले तोडली जातात, ज्यामुळे पानांमधील स्टीव्हियोसाइडचे प्रमाण टिकून राहते.

याशिवाय रोप लावल्यानंतर 2 महिन्यांनी पाने काढली जातात, त्यानंतर स्टीव्हियाचे उत्पादन वर्षातून 3 ते 4 वेळा घेता येते.

स्टीव्हिया पासून किती उत्पन्न मिळतं बर…!

स्टीव्हियाच्या लागवडीसाठी 1 लाख रुपये खर्चून एकरी 40,000 हजार रोपे लावली जातात. मोकळ्या जमिनीवर किंवा बांधावर स्टेव्हियाची लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतात. बाजारात स्टीव्हियाची किंमत 250 ते 500 रुपये किलो दरम्यान असते. अशाप्रकारे 1 एकर शेतातून 25 ते 30 क्विंटल सुक्या पानांचे उत्पादन घेऊन तुम्हाला 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

अर्थातच पाच एकरात या पिकाची शेती केल्यास शेतकरी बांधवांना तब्बल 50 लाखांपर्यंत उत्पन्न मिळणार आहे. एवढेच नाही तर स्टीव्हियापासून अनेक पटींनी अधिक नफा मिळवण्यासाठी स्टीव्हियाची व्यावसायिक शेती किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग देखील करता येते. अलीकडे आपल्या देशात अनेक औषध कंपन्या आणि औषधी संस्था शेतकऱ्यांना कंत्राट देऊन स्टीव्हियाची लागवड करून घेत आहेत. निश्चितच या पिकाची शेती शेतकऱ्यांना बक्कळ नफा मिळवून देणार आहे.