Medicinal Plant Farming: जगात अलीकडे औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे. आपल्या भारतात देखील औषधी वनस्पतींची (Medicinal Crop) मोठ्या प्रमाणात मागणी आहे तसेच भारतात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची शेती शेतकरी बांधव (Farmer) करत आहेत.

आपल्या देशात उत्पादित केलेली औषधी वनस्पती विदेशात देशात निर्यात केली जात आहे. यामुळे औषधी वनस्पतींची शेती (Agriculture News) करणाऱ्या शेतकरी बांधवांना चांगला पैसा शिल्लक राहत आहे. जाणकार लोकांच्या मते, औषधी वनस्पतींची शेती कमी खर्चात करता येत असल्याने हा एक फायद्याचा सौदा शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे.

हेच कारण आहे की, आता शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींच्या लागवडीकडे वळले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी एक औषधी वनस्पतीच्या शेती विषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. मित्रांनो आम्ही ज्या औषधी वनस्पतींच्या शेती बद्दल माहिती आणली आहे ते औषधी वनस्पती आहे (Akarkara Farming) अकरकरा. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया अकरकरा या औषधी वनस्पतीच्या शेतीतील काही महत्वाच्या बाबी.

अकरकरा वनस्पती आहे तरी कशी 

मित्रांनो आकरकरा हे औषधी पीक (Akarakara Crop) असून, त्याला देशात व संपूर्ण जगात मोठी मागणी आहे. मित्रांनो या औषधी वनस्पतीपासून मिळतं असलेल्या मुळांकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. अर्धांगवायूसारख्या गंभीर आजारांपासून ते तोंडाच्या आजारापर्यंत अकरकरा एखाद्या संतापेक्षा कमी नाही. एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, सर्दी, वेदना आणि थकवा यांवर अनेक वर्षांपासून औषध म्हणून या अकरकराचा वापर केला जात आहे. आयुर्वेदात लकवाग्रस्त रुग्णांना आकरकारासोबत मध मिसळून दिल्यास बऱ्यापैकी आराम मिळतो.

अकरकरासाठी उपयुक्त शेतजमीन 

बाजारात अकरकाच्या मुळांना खूप मागणी आहे, त्यामुळे त्याच्या लागवडीसाठी योग्य शेतजमीन निवडणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी मृदू व मऊ माती असलेली शेती जमीन फायदेशीर ठरत असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला गेला आहे.

या जमिनीत अकरकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी थेट पेरणी करून किंवा रोपवाटिकेत प्रगत पद्धतीने रोपे तयार करुण या पिकाची लागवड करता येते. कमी वेळेत अधिक उत्पादनासाठी रोपवाटिकेत रोपांची निर्मिती करून नंतर लागवड करणे फायद्याचे ठरते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा काळ याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य आहे.

अकरकरा पासून मिळणार उत्पादन

अकरकरा हे दीर्घ कालावधीचे औषधी पीक आहे, जे 6 ते 8 महिन्यांत परिपक्व होते. या पिकाच्या मुळांना सर्वाधिक किंमत मिळते, जी अनेक राज्यांच्या मंडईंमध्ये विकली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्य प्रदेशातील मंडईमध्ये अकरकरा 400 रुपये प्रति किलो या दराने विकला जातो. निश्चितच या पिकातून प्रति एकर 4 ते 5 लाख रुपये कमावण्याची खात्री आहे.

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रति एकर जमिनीवर अकरकरा सेंद्रिय शेती करून तुम्ही 10 क्विंटल मुळांचे उत्पादन सहज घेऊ शकता. त्याच वेळी, त्याच्या लागवडीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केवळ 40 हजार रुपये खर्च होतात. अशा प्रकारे शेतकरी 3.6 लाख ते 4.6 लाख रुपये निव्वळ नफा मिळवू शकतात. म्हणजे जर शेतकरी बांधवांनी आपल्या पाच एकरात या पिकाची शेती केली तर 25 लाखांचे उत्पन्न त्यांना मिळणार आहे यामध्ये खर्च वजा जाता 23 लाखांपर्यंतचे उत्पन्न शेतकरी बांधवांना मिळणार आहे.