Maize Farming: भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) सुरू आहे. आपल्या देशात खरीप हंगामात सोयाबीन, कापूस, मका (maize crop) या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (agriculture) केली जाते. मक्याची लागवड (maize cultivation) आपल्या राज्यात देखील विशेष उल्लेखनीय आहे. खरं पाहता, मका हे पीक खरीप हंगामातील मुख्य पीक असून यातून शेतकरी बांधव दरवर्षी लाखो रुपयांची कमाई (farmer income) करत असतात.

गतवर्षी पोल्ट्री उद्योगात मक्याची मागणी वाढली असल्याने मक्याला चांगला समाधानकारक बाजार भाव (maize market price) देखील मिळाला होता. त्यामुळे या वर्षी मक्‍याच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. जाणकार लोकांच्या मते, गतवर्षी सोयाबीनला अधिक बाजार भाव मिळत असल्याने पोल्ट्री उद्योगात मक्याची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत मक्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याचा सौदा सिद्ध होणार आहे. मात्र असे असले तरी मका उत्पादक शेतकरी बांधवांना मक्‍याच्या शेतीत काही गोष्टींची विशेष काळजी देखील घ्यावी लागणार आहे.

खरे पाहाता खरीप हंगामात प्रत्येक पिकावर रोगराईचे तसेच कीटकांचे सावट असते. मका या खरीप हंगामातील मुख्य पिकावर देखील विविध कीटकांचे सावट बघायला मिळते. सध्या राज्यात सर्वत्र पावसाचे वातावरण असल्याने या वातावरणात वेगवेगळ्या कीटकांचा मका पिकावर प्रादुर्भाव बघायला मिळतो. कीटकांमुळे मक्याच्या उत्पादनात मोठी घट होते. शिवाय इतर रोग देखिल कीटकांमुळे मक्याच्या पिकावर येत असतात.

अशा परिस्थितीत आज आपण मका पिकासाठी घातक ठरणाऱ्या स्टेम बोरर या कीटकाचे कशा पद्धतीने नियंत्रण (pest control) केले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया स्टेम बोरर या किडीचे नियंत्रण कशा पद्धतीने केले जाऊ शकते.

स्टेम बोरर कीटक:-

स्टेम बोरर प्रौढ कीटक गुलाबी असतात. या किटकांचा मध्यम आकार असतो. स्टेम बोरर किटकांच्या पंखांवर गडद तपकिरी रंगाचे उभे पट्टे असतात. या किटकांचे कोवळे कीटक स्टेमला/मक्याचे खोड छेदतो आणि आतील मऊ भाग खातो, ज्यामुळे गर्भ सुकतो आणि मका मरण पावतो. यामुळे उत्पादनात भली मोठी घट होते. अशा परिस्थितीत या किटकावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे मत आहे.

स्टेम बोरर कीटक व्यवस्थापन:

मका पेरणी करायची असल्यास शेतकरी बांधवांनी (farmer) उन्हाळ्यातचं शेताची खोल नांगरणी करावी. यामुळे शेतजमिनीत असलेले घातक कीटक मरण पावतात.

मका लागवड केल्यानंतर शेतकरी बांधवांनी तणनियंत्रणासाठी वारंवार खुरपणी व निंदणी तसेच कोळपणी या सर्व शेती मशागतीच्या बाबी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत.

मक्याच्या चांगल्या उत्पादनासाठी तसेच कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात बर्ड पर्चरची व्यवस्था करावी.

कीटकांचे जैविक पद्धतीने नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी मक्याच्या वावरात प्रकाश सापळा बसवावा.

स्टेम बोरर कीटकांचे जास्त प्रादुर्भाव मका पिकात असल्यास शेतकरी बांधवांनी कार्बोफ्युरन 3G किंवा फोरेट 10G ग्रॅन्युलर कीटकनाशक 4-5 ग्रॅन्युल प्रति भुट्टा या दराने प्रक्रिया करावी किंवा इमिडाक्लोरप्रिड 8SL 1 मिली प्रति 3 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी.