Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यात (Maharashtra Monsoon Update 2022) अजूनही पावसाचे सत्र सुरूच आहे.

भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) आज देखील राज्यात पावसाची (Rain) शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात वादळी प्रणाली विकसित झाल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस (Monsoon) पडण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

महाराष्ट्रात विशेषता या प्रणालीमुळे विदर्भात पावसाची (Monsoon News) शक्यता वाढली असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. आज विदर्भात कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. उर्वरित राज्यात मात्र श्रावण सरी बसणार आहेत.

दरम्यान आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोकणातील रायगड जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून पावसाचे सत्र सुरू आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सऱ्या देखील बरसत आहेत.

आज हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे सांगितले आहे तसेच पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेली आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचे विभागाने नमूद केले आहे.

आज भारतीय हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी विशेषता घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवला आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, भारतीय हवामान विभागाने विदर्भातील यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम यातील जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच या संबंधित जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील यावेळी जारी करण्यात आला आहे.