Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात गेल्या महिन्यात पावसाचे (Rain) विक्राळ स्वरूप बघायला मिळाले होते. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात देखील पावसाची (Monsoon News) संततधार राज्यात सुरूचं होती. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अनेक भागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार, आज मान्सून सक्रिय राहणार आहे. मान्सूनच्या दुसऱ्या चरणातील पावसासाठी (Maharashtra Rain) पोषक वातावरण तयार झाले असल्याने येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या मते, आज महाराष्ट्र राज्यातील विदर्भात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यात आज जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

त्यामुळे भारतीय हवामान विभाग केंद्र मुंबई यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन संबंधित जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाने उद्या देखील पावसाची शक्यता वर्तवली आहे. उद्या गुरुवारी राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार असून अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याआधी मंगळवारीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली होती. यामुळे राज्यात सुरू असलेल्या दुसऱ्या चरणातील पावसाचा प्रवास अजूनही पूर्णपणे थांबलेला नसल्याचे चित्र आहे. दरम्यान राज्यातील काही भागात सध्या कोसळत असलेल्या पावसामुळे पिकांचा फायदा होत असून काही भागात यामुळे नासाडी देखील होत आहे.