Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच संपूर्ण देशात पावसाचा (Rain) जोर हा कायम आहे. यामुळे राज्यात सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते (IMD), देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा (Monsoon News) कहर दिसून येणार आहे.

दरम्यान, 20 ऑगस्टपर्यंत अनेक राज्यांमध्ये पाऊस (Monsoon) पडू शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.  हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे तर काही ठिकाणी मात्र, पावसानंतर तापमानात घट झाली आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 17 ऑगस्ट रोजी दक्षिण राजस्थान, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान सौराष्ट्र आणि कच्छच्या भागात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर गोवा आणि कोकणात 20 तारखेपर्यंत पाऊस पडू शकतो. निश्चितच महाराष्ट्रातील कोकणात 20 तारखेपर्यंत भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

बिहार-बंगालमध्ये पावसाचा कहर 

छत्तीसगड, पश्चिम बंगाल, बिहार आणि पूर्व मध्य प्रदेशात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो, असे आयएमडीचे म्हणणे आहे. याशिवाय हिमाचल प्रदेशात 20 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे.

अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली

भारतीय हवामान खात्यानुसार, 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान पाऊस पडू शकतो. याशिवाय पूर्व उत्तर प्रदेशात 19 आणि 20 ऑगस्टला पूर्व उत्तर प्रदेश आणि 20 ऑगस्टला पश्चिम उत्तर प्रदेशात पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज (17 ऑगस्ट) उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, पंजाब आणि राजस्थानमध्ये 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.

महाराष्ट्रात कसा असेल पावसाचा मिजाज 

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अद्ययावत माहिती नुसार, आज राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरणार असल्याचे चित्र आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. आज 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पुणे, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.